कर्नाटकचे CM सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा, मुडा प्रकरणात लोकायुक्तांकडून क्लीन चिट

Clean chit given to Chief Minister Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि त्यांच्या कुटुंबाला मुडा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सिद्धरामय्या यांना म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणात लोकायुक्तांकडून क्लीन चिट मिळाली आहे. सिद्धरामय्या आणि त्यांची पत्नी पार्वती यांच्यासह चारही आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचे लोकायुक्त पोलिसांनी सांगितले.
धसही तसेच त्यांची मुंडेंशी सेटलमेंट, ते कधीही बदलू शकतात; अंजली दमानियांचे आरोप
स्नेहमयी कृष्णा यांनी सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सिद्धरामय्या यांनी MUDA प्राधिकरणात जमीन घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू होती. अखेर आज लोकायुक्त पोलिसांनी सिद्धरामय्यांची चौकशी केली. लोकांयुक्तांच्या मते, मुडा प्रकरणात पुराव्यांचा मोठा अभाव आहे. आरोपींविरुद्ध कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. आता या प्रकरणाचा अंतिम अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आलाय.
सिद्धरामय्यांची दोन तास चौकशी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समन्स मिळाल्यानंतर सिद्धरामय्या लोकायुक्त पोलिसांसमोर हजर झाले, तिथं लोकायुक्त पोलिसांनी मुख्यमंत्र्यांची सुमारे २ तास चौकशी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले होते की, मी लोकायुक्त पोलिसांना सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि त्यांना सगळी खरी माहिती दिलीये. जोपर्यंत न्यायालयाकडून कोणताही निर्णय येत नाही, तोपर्यंत मी निर्दोष आहे. माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत, असं सिद्धरामय्या म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, ‘सिद्धरामय्या यांनी कोणतीही चूक केलेली नाही. तरीही कायद्याचा आदर करत, ते लोकायुक्त पोलिसांसमोर हजर झाले होते. सिद्धरामय्या यांनी मिळालेली क्लीनचिट सत्याचा विजय असल्याचं डीके शिवकुमार म्हणाले.
कर्नाटकचे CM सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा, मुडा प्रकरणात लोकायुक्तांकडून क्लीन चिट
संपूर्ण प्रकरण काय आहे?
मुडा कंपनीवर अनेक लोकांना कमी किमतीत मालमत्ता दिल्याचा आरोप आहे. यामध्ये सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना म्हैसूरच्या पॉश भागात दिलेल्या १४ जागांचाही समावेश आहे. म्हैसूरच्या कसबा होबली येथील कसारे गावात असलेल्या त्यांच्या ३.१६ एकर जमिनीच्या बदल्यात या जमिनी देण्यात आल्या. १४ जागा ३ लाख २४ हजार ७०० रुपयांना देण्यात सिध्दरामयय्या यांच्यावर होतोय. याच प्रकरणी १७ जानेवारी रोजी ईडीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांच्या ३०० कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या होत्या.