धसही तसेच त्यांची मुंडेंशी सेटलमेंट, ते कधीही बदलू शकतात; अंजली दमानियांचे आरोप

धसही तसेच त्यांची मुंडेंशी सेटलमेंट, ते कधीही बदलू शकतात; अंजली दमानियांचे आरोप

Anjali Damania on Suresh Dhas for Allegations on Dhananjay Munde : राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांची काही दिवसांपूर्वी गुप्त भेट झाल्याचं उघडकीस आल्यानंतर या प्रकरणावरून सध्या राज्याचे राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यावर आता हे प्रकरण लावून धरेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धसांवर टीका केली आहे.

चेंगराचेंगरीपेक्षा चित्रपटातील सीन पाहून जो समाज भावूक होतो, तो मनाने आणि आत्म्याने मेलेला समाज; छावा सिनेमाबाबत स्वराचे विधान

त्या म्हणाल्या की, धस आणि मुंडे यांची गुप्त भेट झाली. त्यावेळी त्यांच्यात नक्की काही तरी सेटलमेंट झाली आहे. मी सुरेश धस यांना कित्येक वर्ष झाले ओळखते हा माणूस कधी ही बदलू शकतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी हा केवळ राजकिय ड्रामा केला. त्यांना वाटलं नव्हतं हे प्रकरण इथपर्यंत जाईल. धसही तसेच आहेत ते ही तेच करतात. असं म्हणत दमानिया यांनी धसांना पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे.

मोठी बातमी! मध्यप्रदेशातील बालाघाटमध्ये 3 कुख्यात महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

दरम्यान याबाबत त्यांनी पोस्ट करून देखील टीका केली होती. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, खूप खूप खूप राग येतोय. किळस येतेय या राजकारणाची. एका सामान्य माणसाचा इतका क्रूर मृत्यू होतो तरी हे फक्त राजकारण करणार? मी बीडला गेल्यापासून मी कधीही सुरेश धस यांच्या बरोबर मोर्च्यात गेले नाही. मला खात्री होती की हे कधीही पलटतील.

मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत खोट बोलत 200 कोटींचा कृषी घोटाळा; दमानिया मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक

मी हे धनंजय देशमुख ह्यांना देखील म्हटले होते. आज प्रश्न पडतो की धसांना हृदय आहे की नाही? धसांचे पाय कसे चालले? कसे गेले ते धनंजय मुंडेंची भेट घ्यायला? एका कुटुंबाला न्याय मिळवून देणार होता ना? इतके निर्दयी कसे हे राजकारणी? इतक्या मोर्च्यांमध्ये गेलात, इतके डायलॉग मारले ते फक्त नाटक होते? किळस आली आहे ह्या सगळयांची. असं अंजली दमानिया एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube