Download App

Air India Plane Crash : ‘सारे अवशेष एकाच मृतदेहाचे आहेत का? विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचा सवाल…

Air India Plane Crash In Ahmedabad : गुजरातमध्ये (Gujrat) झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात प्रवाशांचा जळून (Ahmedabad Plane Crash) कोळसा झालाय. तर मृतदेहांची डीएनए टेस्ट करून अवशेष त्यांच्या कुटुंबाकडे सोपविले जात आहेत. परंतु प्रत्येक भागाची डिएनए चाचणी करा, सारे अवशेष एकाच मृतदेहाचे आहेत का? याची खात्री देखील मृत व्यक्तींचे नातेवाईक करत आहेत. मृतांच्या नातेवाईकांकरिता अहमदाबादच्या सिव्हिल रूग्णालयात (Air India Plane Crash) एक स्वतंत्र डिएनए चाचणी कक्ष तयार करण्यात आलाय. तिथे जाणाऱ्या नातेवाईकांचे डीएनए नमुने घेतले जात आहेत, त्यावरून मृतदेहांची ओळख पटवली जात आहे.

शरिराच्या प्रत्येक भागाचा डिएनए करा

या विमान अपघातामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांचा आहे. महादेव तुकाराम पवार आणि आशा महादेव पवार यांचा विमानात मृत्यू झालाय. मृतदेहाचे अवशेष देताना शरिराच्या प्रत्येक भागाचा डिएनए करा, अशी मागणी अपघातात मृत्यूमुखी पडलेले महादेव पवार यांचे पुतणे महेश पवार यांनी केलीय.

Ahmedabad plane crash नंतर विमानाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; प्रवासाअगोदर असं चेक करा तुमच्या विमानाचं वय अन् सेफ्टी

पहिला विमानप्रवास ठरला अखेरचा

सोलापूरच्या या जोडप्याचा धाकट्या मुलाला भेटण्याची ओढ अधुरी राहिली. त्यांनी पहिल्यांदाच विमानप्रवास केला होता, मात्र तो अखेरचा ठरला. धाकट्या मुलाला लंडनला भेटण्यासाठी निघालेले मूळ सांगोल्याचे असलेले महादेव पवार आणि आशाताई पवार या अहमदाबादवरून विमानाने निघाल्या होत्या. परंतु त्यांच्यावर मध्येच काळाने झडप घातली.

तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात? इस्रायल-इराण आमने-सामने, सूडयुद्धाचा इशारा …

अंत्यसंस्कार अत्यंत महत्त्वाची धार्मिक विधी

हिंदू धर्मासह अन्य सर्व धर्मांमध्ये अंत्यसंस्कार अत्यंत महत्त्वाची धार्मिक विधी आहे. प्रशासनानं प्रत्येकाच्या भावनेचा आदर करायला हवा. या दुर्घटनेमध्ये अनेकांनी नातेवाईकांच्या रूपात आपलं सर्वस्व गमवलंय. त्यामुळे मृत व्यक्तींचे अवशेष परत घेताना ते आपल्याच व्यक्तीचे आहेत ना? अशी भावना निर्माण होणं स्वाभाविकच आहे. त्यामुळेच ही मागणी महादेव पवार आणि आशा पवार या मृत पावलेल्या दांपत्याचे पुतणे महेश पवार यांनी केलीय.

अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या कसोटी भवन येथे आज सकाळपासून डीएनए टेस्ट प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत 240 डीएनए टेस्ट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये आतापर्यंत 227 प्रवाशांच्या नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट करण्यात आले असून इतर 13 मृतदेहांच्या नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट केल्या गेल्या आहेत. साधारणपणे 72 तासानंतर डीएनए टेस्ट मॅचचे रिपोर्ट समोर येणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे नातेवाईकांनी संयम ठेवावं, असं आवाहन सुद्धा केलं जात आहे.

 

follow us