Ahmedabad Plane Crash 31 Victims Identities DNA Tests : तीन दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये (Air India Plane Crash) गुरुवारी झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जात (Ahmedabad Plane Crash) आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने आज सांगितले की, डीएनए चाचणीद्वारे अधिकाऱ्यांनी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान (DNA Tests) अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 31 जणांची ओळख पटवली आहे. आतापर्यंत 12 कुटुंबांनी मृतदेहांवर दावा केला आहे. दरम्यान, गुजरात (Gujrat) सरकारने मृतदेह नातेवाईकांना देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
विजय रुपानी यांच्या मृतदेहाचीही ओळख पटली
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या मृतदेहाचीही ओळख पटली आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाला सांगितले की, त्यांचा डीएनए मॅच झाला आहे. राजकोटमधील अंत्यसंस्काराच्या पुढील प्रक्रियेत राज्य सरकार त्यांना सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला सांगितले आहे. त्यांचे मृतदेह कधी घ्यायचे हे कुटुंबातील सदस्य ठरवतील. यापूर्वी, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, पीडितांच्या कुटुंबियांशी समन्वय राखण्यासाठी 230 पथके तयार करण्यात आली आहेत.
दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना दिलासा! छगन भुजबळांची मोठी घोषणा, नाशिकचं पालकमंत्रीपद…
192 रुग्णवाहिका तैनात
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानात 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. एक प्रवासी बचावला. विमान अपघाताच्या तिसऱ्या दिवशी गुजरात सरकारने मृतदेह नातेवाईकांना देण्याचे काम सुरू केले आहे. TV9 ला मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी सुमारे एक हजार लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. सरकारने गुजरातच्या विविध जिल्ह्यांमधून रुग्णवाहिका मागवल्या आहेत. या कामासाठी एकूण 192 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाचणार! थेट शाळेत मिळणार एसटी पास, प्रताप सरनाईकांचा निर्णय
एका रुग्णवाहिकेत चालक आणि सहाय्यक कर्मचारी असतात. मृतदेह नातेवाईकांच्या घरी नेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे सरकारने जाहीर केले आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलने दर 2 तासांनी मेडिकल बुलेटिन जारी करण्याची घोषणा केली आहे. यासाठी, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 590 डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफची टीम तैनात करण्यात आली आहे. ही टीम 24×7 मोडवर काम करत आहे. डीएनए मॅच होताच, कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात आहे.