Ahmedabad plane crash व्हिडीओ काढणारा पोलिसांच्या ताब्यात; व्हिडीओ काढण्यामागील कारण समोर…

Ahmedabad plane crash व्हिडीओ काढणारा पोलिसांच्या ताब्यात; व्हिडीओ काढण्यामागील कारण समोर…

Ahmedabad plane crash video maker in police custody; Reason behind video making revealed : 12 जूनला अहमदाबादमध्ये (Ahmedabad plane crash) एका विमानाचा अपघात झाला अन् क्षणात सगळं काही होत्याचं (Ahmedabad Plane Crash) नव्हतं झालं. विमानातील एकूण 241 लोकांच्या मृत्यूने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. मात्र या घटनेमध्ये अद्यापही मृत्यू थांबताना दिसत नाहीयेत. या घटनेमध्ये मृतांचा आकडा आता 275 वर गेला आहे. त्याच बरोबर हा अपघात झाल्यानंतर त्याचे काळजाचा थरकाप उडवणारे फोटो समोर येत आहेत. त्यात सुरूवातीलाच या अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र हा अपघात होतानाचा व्हिडीओ अगदी अचूक वेळी कसा काय काढला गेला. याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता यामागील कारण शोधण्यासाठी पोलिसांनी हा व्हिडीओ काढणाऱ्या तरूणाला ताब्यात घेतलं आहे.

व्हिडीओ काढण्यामागील कारण समोर…

अहमदाबादातील मेघानीनगर परिसरात 12 जून गुरुवारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचं विमान कोसळल्याने मोठा अपघात झाला. याचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ काढला होता. आर्यन नावाच्या तरुणाने. तो गावाकडून आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता. यावेळी घराच्या अगदी जवळून जाणाऱ्या विमानाबद्दल त्याला प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे तो हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्याला विमानात बसण्याची हौस आहे. मित्रांना हा व्हिडिओ दाखवण्यासाठी त्यांनी रेकॉर्ड केला. या व्हिडिओमधून नागरी वस्तीतून इमारतींच्या जवळून विमान जात होते. मात्र पुढे जाताच ते खाली कोसळले आणि प्रचंड मोठे असे आगीचे लोट पाहायला मिळाले.

Video सरपंच जेव्हा खासदार होतो.. उमेदवारीला का झाला उशिर? ऐका काय म्हणाले म्हढाचे खासदार

या अपघातीचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. मात्र आर्यनने काढलेल्या व्हिडीओमध्ये विमान अगदी जवळून दिसत आहे. तसेच आर्यन आणि कुटुंबाला या व्हिडीओबाबत विचारले असता. त्यांनी सांगितले की, त्याने हा व्हिडीओ उत्सुकतेपोटी काढला आहे. मात्र पोलिसांनी यामागील कारण जाणून घेण्यासाठी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच आर्यनच्या बाहिणीने सांगितले की, आर्यनने विमानाचा व्हिडीओ काढला. पण जेव्हा स्फोट झाला. तेव्हा तो खूप घाबरला. त्याने रेकॉर्डिंग बंद केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube