AIADMK BJP Alliance: तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलथापालथ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनसंदर्भात वक्तव्य केले होते. त्यानंतर प्रचंड गदारोळ उडाला होता. आज तामिळनाडूमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मित्रपक्ष एआयएडीएमकेने भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली आहे. दिवंगत मुख्यमंत्री आणि त्यांच्या इतर नेत्यांचा अपमान सहन करू शकत नसल्याचे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी द्रविड चळवळीचे नेते आणि तामिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री सी एन अन्नादुराई यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. यानंतर एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते डी जयकुमार म्हणाले की त्यांचा पक्ष हा सिंहांचा समूह आहे आणि अन्नामलाई हा लहान कोल्हा आहे.
IND vs AUS: टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटला विश्रांती; अश्विनचे पुनरागमन
डी जयकुमार म्हणाले, ‘त्याच्यात हिंमत असेल तर एकट्याने निवडणूक लढवा. NOTA पेक्षा जास्त मते मिळणार नाहीत. पेरियार, एमजीआर, अम्मा किंवा आमचे नेते (के पलानीस्वामी) यांसारख्या नेत्यांवर भाष्य करण्याची त्यांची पात्रता काय आहे? आम्ही त्यांना अनेक इशारे दिले पण ते सुधारले नाहीत. आता आमचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही.’
AIADMK सरचिटणीस आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती.
LIC एजंटनाही मिळणार ग्रॅच्युइटी अन् पेन्शन; मोदी सरकारने केली मोठी घोषणा
आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की आमची इंडिाय आघाडी कालही मजबूत होती आणि आजही मजबूत आहे, पण दु:खाची गोष्ट म्हणजे इतरांच्या घरावर दगडफेक करणारा एनडीए स्वतःचे घर वाचवू शकला नाही.