Download App

मोठी बातमी: एअर इंडियाच्या विमानात बिघाड ! दोन तास हवेत घिरट्या, 141 प्रवाशांचा जीव मुठीत

केरळमधील त्रिची विमानतळ (Trichy Airport) येथे हा प्रकार घडला आहे. या विमानाने याच विमानतळावरून शारजाकडे उड्डाण घेतले होते.

  • Written By: Last Updated:

Air India Express flight : एअर इंडियाच्या एक्स्प्रेस विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमान हे तब्बल दोन तास विमानतळाभोवती घिरघ्या गालात होते. शेवटी विमानचालकाने प्रयत्न करत विमान हे सुरक्षितपणे विमानतळावर उतरविले आहे. तामिळनाडूतील त्रिची विमानतळ (Trichy Airport) येथे हा प्रकार घडला आहे. या विमानाने याच विमानतळावरून शारजाकडे उड्डाण घेतले होते. पण उड्डाण घेतल्यानंतर काहीच वेळात विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. या विमानामध्ये 141 जण प्रवास करत होते.

त्रिची येथून हे विमान शारजाकडे जात होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर हायड्रोलिक सिस्टमध्ये बिघाड झाला आहे. विमानाचा गिअर अडकला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विमानचालकाला पुन्हा विमान धावपट्टीवर उतरविता येत नव्हते. विमान हे विमानतळाभोवतीची घिरट्या घालत होते. सुरक्षेसाठी सर्व उपाय करण्यात आले होते. विमानतळावर वीसहून अधिक अॅम्बुलन्स आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.

आझाद मैदानावर शिंदेंची तोफ धडाडणार, विधानसभेचे वातावरण तापणार? 

तसेच विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर दोन ते अडीच तास विमानचालक विमान हवेत फिरविले आहे. त्यातील इंधन संपत आल्यानंतर विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरविण्यात मदत होणार होते. सुमारे दोन ते अडीच तासाने इंधन कमी झाल्यानंतर हे विमान हे सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरविण्यात आले आहेत. त्यात सर्व प्रवासी सुखरुपणे बाहेर आले आहेत.

अभिनेते सयाजी शिंदेंची राजकीय इनिंग, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

पायलटला सॅल्यूट
आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमानचालकाने सर्व प्रवाशांना सुखरुप पुन्हा विमानतळावर उतरविले. त्यानंतर विमानतळावरील स्टॉफ, इतर अधिकारी आणि प्रवाशांनी पायलटला सॅल्यूट ठोकला.

follow us