Download App

दिल्लीपासून मुंबईपर्यंतचा श्वास गुदमरला; ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच का बनते गॅस चेंबर?

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली :  देशभरातील प्रमुख शहरांमधील वायू प्रदुषणामुळे राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. यामुळे करोडो नागरिकांना श्वसनासंबंधीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुरूवारी (दि.2) दिल्लीत गेल्या पाच वर्षातील सर्वात खराब हवेची गुणवत्ता (Air Quality) नोंदवण्यात आली असून, नोएडामध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 695 वर पोहोचला आहे. तर, दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील हवाची गुणवत्ता AQI 200 च्या वर नोंदवण्यात आली आहे. हवेची खराब होणारी गुणवत्ता नेमकी कशी मोजली जातेपासून ते दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच गॅस चेंबरची निर्मिती का होते? याबाबत जाणून घेणार आहोत. (Delhi Air Pollution News)

Maratha Reservation : फडणवीसांचे नियोजन, CM शिंदेंचे प्रयत्न अन् जरांगेंनी साधलेले टायमिंग

राजधानी दिल्लीतील परिस्थिती नेमकी कशी?

राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता सर्वात खराब असल्याचे नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी दिल्लीचा AQI 346 नोंदवला गेला असून, या हंगामातील ही नोंद सर्वोच्च AQI नोंदवण्यात आली आहे. तर नोएडामध्ये AQI 695 वर पोहोचला आहे. वाढत्या खराब हवेमुळे अनेक नागरिकांना श्वसनासह डोळ्यांची जळजळ होण्यासह अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Lok Sabha Election : 2024 साठी खडसेंची मोठी घोषणा! तिकीट मिळाल्यास रावेरमधून लढणार

मुंबईतील हवेची गुणवत्ता कशी?

देशाच्या राजधानीसह आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईतही हवेची गुणवत्ता खराब (Mumbai Air Quality) असल्याचे नोंदवण्यात आले आहे. येथील हवेची गुणवत्ता 150 ते 200 च्या AQI मध्ये नोंदवण्यात आली आहे. यानंतर वाढते प्रदुषण रोखण्यासाठी मुंबई वायु प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिंदुस्थान पेट्रोलियम, टाटा पॉवरसह अन्य कंपन्यांना त्यांचे उत्पादन निम्म्याने कमी करण्यास सांगितले आहे.

एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) म्हणजे काय?

AQI हा दैनिक हवेच्या गुणवत्तेच्या अहवालासाठीचा निर्देशांक आहे. याच्या सहाय्याने हवेची गुणवत्ता मोजली जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खराब AQI मध्ये राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला गंभीर हानी होण्याचा धोका असतो.

हवेची गुणवत्ता कशी मोजली जाते?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील 99% लोकसंख्या अशुद्ध हवेत श्वास घेत आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 7 दशलक्ष अकाली मृत्यू होत असल्याचेही समोर आले आहे. जेव्हा हवेची गुणवत्ता खराब असते तेव्हा सूक्ष्म कणांमुळे (पीएम 2.5) चिंतेची बाब बनते. वास्तविक, PM2.5 म्हणजे 2.5 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचे कण हे आरोग्यासाठी सर्वात धोकादायक ठरतात. PM 2.5 बहुतेकदा हवेच्या गुणवत्तेच्या मानकांमध्ये मोजमाप म्हणून वापरले जाते. PM2.5 किंवा त्यापेक्षा कमी व्यासाच्या कणांमुळे हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याचा धोका असतो.

उत्तर देण्याऐवजी ‘त्या’ संतप्त झाल्या अन्… : मोईत्रांच्या आरोपांवर अध्यक्ष विनोद सोनकरांचा मोठा दावा

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच का खराब होते दिल्लीतील हवा?

दिल्लीच्या सततच्या हवेच्या गुणवत्तेच्या संकटामागे अनेक कारणे आहेत. यातील प्रमुख कारणं म्हणजे वाढती वाहनांची संख्या, बांधकाम, औद्योगिक प्रदूषण, फटाके आदींचा समावेश आहे. राजधानीतील प्रदूषणाचे दुसरे कारण म्हणजे याची भौगोलिक स्थिती हेदेखील आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान दिल्लीत हवेत मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होतो. हिवाळ्यात स्थिर होणाऱ्या वाऱ्यामुळे प्रदुषणाचे कण एकाच जागेवर स्थिर होऊन अडकतात. कमी वाऱ्यामुळे प्रदुषित हवा वरच्या बाजूला जाण्यापासून रोखते. यामुळे प्रदुषित कण खालच्या स्तरावर राहून हवेची गुणवत्ता बिघडण्यास कारणीभूत ठरते.

Tags

follow us