Download App

Telangana : काँग्रेसचा निर्णय अन् भाजप आमदारांनी घेतली शपथ; तेलंगणाच्या राजकीय नाट्याला फुलस्टॉप!

Telangana News : तेलंगाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा (Telangana News) दणदणीत पराभव करत राज्याची सत्ता हाती घेतली. यानंतर रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या कारभाराला सुरुवातही केली. त्यांच्याबरोबर काँग्रेसच्या काही आमदारांनीही शपथ घेतली. पण, भाजपाच्या एकाही आमदराने शपथ घेतली नाही. त्याचं कारण होतं प्रोटेम स्पीकर अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांच्यासमोर शपथ न घेण्याची घोषणा. अखेर काँग्रेस सरकारने पूर्णकालिक अध्यक्षांची नियुक्ती केल्यानंतर राज्यातील भाजपाच्या 8 आमदारांनी शपथ घेतली.

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते गद्दाम प्रसाद कुमार यांनी विधानसभा अध्यक्षांचा पदभार स्वीकारल्यानंतरच भाजपाच्या आमदारांनी विधिमंडळात शपथ घेतली. याआधी अकबरुद्दीने ओवैसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ओवैसी यांच्यासमोर कोणत्याही परिस्थितीत शपथ घेणार नसल्याचे आमदार टी. राजासिंह यांनी स्पष्ट केले होते.

तेलंगणात ‘रेड्डी’राजची सुरुवात! एक उपमुख्यमंत्री अन् 11 मंत्र्यांसह घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

या वादावर पडदा पडला तो गद्दाम प्रसाद कुमार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर. यानंतर भाजप आमदार टी. राजासिंह, येलेटी महेश्वर रेड्डी, वेंकटरमण रेड्डी, पायल शंकर, पैडी राकेश रेड्डी, रामाराव पटेल पवार, धनपाल सूर्यनारायण आणि पलवई हरिश बाबू या आठ जणांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यानंतर मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेलं तेलंगणातील राजकीय नाट्य अखेर आज थांबलं.

तेलंगणातील (Telangana) काँग्रेसच्या विजयाचे नायक म्हटल्या जाणाऱ्या रेवंथ रेड्डी यांनी (Revanth Reddy) राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यासोबतच भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर अन्य 11 जणांनी मंत्रीपदाची शपथ 7 डिसेंबरलाच घेतली होती. त्यानंतर बाकीच्या आमदारांना शपथ देण्यासाठी प्रोटेम स्पीकर म्हणून अकबरुद्दीने ओवैसी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

परंतु, ओवैसी यांच्यासमोर शपथ घेणार नसल्याचे भाजप आमदार टी. राजासिंह यांनी स्पष्ट केले होते. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती आणि भाजपाचा एकही आमदार ओवैसी यांच्यासमोर शपथ घेणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हा वाद अधिकच वाढत चालला होता. काँग्रेसच्या आमदारांनी शपथ घेतली मात्र भाजप आमदार शपथ घेण्यास तयार नव्हते. यानंतर काँग्रेसने निर्णय घेत गद्दाम प्रसाद कुमार यांची विधासभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. यानंतरच भाजप आमदारांनी विधिमंडळात येत पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

कर्नाटक-तेलंगाणाने मारली बाजी; दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण, पहा, कितवा आहे नंबर ? 

Tags

follow us