तेलंगणात ‘रेड्डी’राजची सुरुवात! एक उपमुख्यमंत्री अन् 11 मंत्र्यांसह घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
हैदराबाद : तेलंगणातील (Telangana) काँग्रेसच्या विजयाचे नायक म्हटल्या जाणाऱ्या रेवंथ रेड्डी यांनी (Revanth Reddy) राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यासोबतच भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर अन्य 11 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (Revanth Reddy took oath as the new Chief Minister of Telangana)
असे असणार तेलंगणाचे नवे मंत्रिमंडळ :
अनुमला रेवंथ रेड्डी – मुख्यमंत्री
भट्टी विक्रमार्क – उपमुख्यमंत्री
दामोदर राजनरसिंह : मंत्री
उत्तमकुमार रेड्डी : मंत्री
भट्टी विक्रमार्क : मंत्री
कोमटी रेड्डी वेंकट रेड्डी : मंत्री
सीताक्का : मंत्री
पोन्नम प्रभाकर : मंत्री
श्रीधर बाबू : मंत्री
तुम्माला नागेश्वर राव : मंत्री
कोंडा सुरेखा : मंत्री
जुपल्ली कृष्ण पांगुलेती : मंत्री
PM Modi : वसुंधरा, शिवराज अन् रमणसिंहांचं नावच नाही; पीएम मोदींचाही CM बदलाचा मूड?
शपथविधी सोहळ्याला खर्गेंसह गांधी कुटुंबीयाची उपस्थिती :
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, काँग्रेसचे राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे उपस्थित होते. याशिवाय शपथविधी सोहळ्यासाठी इंडिया आघाडीत समाविष्ट असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले होते.
दोन नावांना मागे टाकत रेड्डींनी मारली बाजी :
तेलंगणात तीन नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती यातील सर्वात मोठे नाव म्हणजे रेवंत रेड्डी यांचेच होते. याशिवाय भट्टी विक्रमार्का मल्लूही शर्यतीत होते. तब्बल 1400 किलोमीटरच्या पदयात्रेनंतर मल्लू चर्चेत आले होते. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष उत्तमकुमार रेड्डी हेही या शर्यतीत होते. मात्र आता या दोघांचीही नावे मागे पडली असून रेवंथ रेड्डी यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
रश्मिकानंतर आता रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ; प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन
रेवंत रेड्डी यांना मोठा विरोध
दरम्यान, रेवंत रेड्डी यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधाचाही सामना करावा लागला. यामध्ये ज्येष्ठ नेते एन उत्तम कुमार रेड्डी, भट्टी विक्रमार्क, माजी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकटा रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांनी रेड्डी यांना तीव्र विरोध केला होता. रेड्डी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे आणि रेड्डी यांच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खराब कामगिरीकडे लक्ष वेधले होते.
#WATCH | Congress leader Revanth Reddy takes oath as the Chief Minister of Telangana at Hyderabad's LB stadium; Governor Tamilisai Soundararajan administers him the oath of office. pic.twitter.com/TBtZRE0YQD
— ANI (@ANI) December 7, 2023