Telangana : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं ?

Telangana : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं ?

Telangana News : तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत (Telangana Election 2023) भारत राष्ट्र समितीचा दणदणीत पराभव झाल्यानंतर आणखी एक मोठी बातमी तेलंगणातून आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार केसीआर यांच्या पायाला दुखापत झाली आहे. चंद्रशेखर राव गुरुवारी पाय घसरून पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना हैदराबाद शहरातील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पायाची दुखापत किती गंभीर आहे याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही. केसीआर यांच्या कंबरेला जबर मार बसल्याचे सांगण्यात येत आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांकडून तपासणी केली जात आहे.

राव यांना फ्रॅक्चर झाले असावे असे डॉक्टरांचे मत आहे. काल रात्री उशिरा त्यांना हैदराबाद शहरातील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. माजी मुख्यमंत्री मागील तीन दिवसांपासून त्यांच्या राहत्य घरी लोकांची भेट घेत होते. त्यानंतर त्यांच्याबाबत ही घटना घडली. रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहितीही वेळोवेळी दिली जात आहे.

निवडणुकीत बीआरएसचा दारुण पराभव

तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यापासून चंद्रशेखर राव हेच राज्याचे मुख्यमंत्री होते. यावेळच्या निवडणुकीत मात्र जनतेने त्यांना साफ नाकारले. त्यामुळे निवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव झाला. काँग्रेसला 64 तर भारत राष्ट्र समितीला फक्त 39 जागा मिळाल्या. भाजपाने 8 आणि अन्य पक्षांना 8 जागांवर विजय मिळाला.  या निवडणुकीत केसीआर दोन मतदारसंघात उभे होते. गजवेल मतदारसंघातून ते विजया झाले मात्र कामारेड्डी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार कटीपल्ली वेंकट रमण रेड्डी यांनी यांनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे याच मतदारसंघात आताचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) सुद्धा रिंगणात होते. त्यांचाह पराभव झाला.

तेलंगणाच्या विजयाचा जादूगार ‘रेवंत रेड्डी’ मुलीच्या लग्नासाठी मिळला होता फक्त 12 तासांचा जामीन

दरम्यान, भारत राष्ट्र समितीच्या दहा वर्षांच्या सत्तेला काँग्रेसने पूर्णविराम दिला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार समजले जाणारे रेवंंथ रेड्डी यांनी काल राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर आणखी 11 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या मंत्र्यांना लवकरच खातेवाटप केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तेलंगाणा नवीन राज्याची निर्मिती झाल्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर सत्तेत येण्याची संधी काँग्रेसला मिळाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube