All 4 Shankrachary will on a stage after 19 years and Contervercy with Yogi : नेहमीच विविध वक्तव्य आणि भाजपविरोधी पवित्रा घेणारे ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा नुकताच योगी सरकारशी वाद झाला. हा वाद मौनी अमास्येच्या दिवशी शंकराचार्यांची पालखी संगम घाटावर नेण्यास उत्तर प्रदेश प्रशासनाने केलेला मज्जाव यामुळे झाला. याची देशभर चर्चा आणि टीका टिप्पणी झाली.
Stock Market On Budget Day : गेल्या 10 वर्षांत मार्केटचा ग्राफ कसा? कधी घसरला, कधी वाढला?
त्यानंतर आता तब्बल एकोणावीस वर्षांनंतर देशातील चारही पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपीठावर येणार आहेत. दिल्लीमध्ये गोमाता रक्षणासाठी भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. यासाठी हे सर्वजण एकत्र येतील. मात्र अगोदरच अविमुक्तेश्वरानंदानी भाजपसोबत असलेला वाद त्यानंतर नुकतीच त्यात भर पडलेला योगी सरकारसोबतचा वाद या पार्श्वभूमीवर या सर्वांचे एकत्र येणे संपूर्ण देशभराचे लक्ष वेधून घेत आहे.
नेमकं काय घडलं होतं?
रविवारी 18 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची पालखी संगमावर स्नानासाठी चालली होती. त्यावेळी उत्तर प्रदेश प्रशासनाने पालखी घाटावर नेण्यास मज्जाव केला. त्यांना पायी जाण्याची विनंती करण्यात आली. मात्र परंपरा असल्याचं म्हणत त्यांनी नकार दिला. यावरून शंकराचार्यांच्या शिष्यांना मारहाण करण्यात आली. पालखी जबरदस्तीने मागे नेली गेली.
स्मृतीसोबतच्या लग्नाअगोदर पलाश मुच्छल दुसऱ्या मुलीसोबत बेडवर; टीम इंडियाच्या मुलींकडून बेदम मारहाण…
या घटनेने संतप्त शंकराचार्यांनी स्नान न करताच परत फिरण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत सन्मानाने स्नान होत नाही तोपर्यंत मी तंबूत परत जाणार नाही. असा पवित्रा त्यांनी घेतला. गेल्या 4 दिवसांपासून अविमुक्तेश्वरानंदांनी धरणे धरले आहे. त्यावर प्रशासनाने त्यांना शंकराचार्य असल्याचं स्पष्टीकरणाचा पुरावा मागितला. यासाठी प्रशासनाने 37 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाचा दाखला दिला, या प्रकरणावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.
राष्ट्रगीताप्रमाणे वंदे मातरमसाठी देखील उभं रहावं लागणार; लवकरच येणार नियम
त्यानंतर आता 10 मार्च 2016 रोजी दिल्ली येथे गोमाता रक्षणासाठी भव्य आंदोलन व कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल एकोणावीस वर्षांनंतर देशातील चारही पीठांचे शंकराचार्य एकाच व्यासपीठावर येणार आहेत. ‘गोमाता राष्ट्रमाता अभियान’च्या मंचावरून चारही शंकराचार्य एकत्र येण्याची शक्यता असून, हा कार्यक्रम देशपातळीवर मोठ्या आंदोलनाचे स्वरूप घेऊ शकतो.
