Cough Syrups : देशात खोकल्याची औषधे (कफ सिरप) खेरदी आणि विक्रीसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता कप सिरपसह सर्व प्रकारची सिरप आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाही. देशात यापूर्वी डॉक्टारांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देखील मेडिकलमधून सिरप सहज खरेदी करता येत होती मात्र आता प्रिस्क्रिप्शनशिवाय सरप खरेदी करता येणार नाही.
केंद्र सरकारने ‘ड्रग्ज रूल्स, 1945’ (Drugs Rules, 1945) मध्ये सुधारणा करून या औषधी सिरपच्या ‘ओव्हर-द-काउंटर’ (OTC) म्हणजेच प्रिस्क्रिप्शनशिवाय थेट विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम शहरांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात होता, परंतु आता तो ग्रामीण भागांतही लागू करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार आता नोंदणीकृत डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सरप खरेदी करता येणार नाही. औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि रुग्णांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने हे नवीन नियम लागू केले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
यासाठी आरोग्य मंत्रालयाने ‘ड्रग्ज रूल्स, 1945’ मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना जारी केली. नवीन नियमांनुसार, ‘शेड्युल के’ (Schedule K) मध्ये समाविष्ट असलेल्या औषधांच्या यादीतून ‘सिरप’ हा शब्द वगळण्यात आला आहे. त्यामुळे आता काही औषधी सिरप ‘शेड्युल के’ अंतर्गत पूर्वी मिळणाऱ्या विशिष्ट सवलतींसाठी पात्र राहणार नाहीत.यामुळे आता खोकल्याच्या औषधांच्या विक्रीसाठी डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन अनिवार्य करण्यात आले आहे.
VIP दर्शन बंद, आता सर्व भाविकांसाठी एकच नियम; भीमाशंकर देवस्थानकडून मोठा निर्णय
कारण काय?
मध्य प्रदेशसह देशातील इतर काही राज्यात काही महिन्यांपूर्वी खोकल्याच्या औषधांशी संबंधित समस्यांमुळे खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सिरप खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली आहे.
