America angry after India Agreement With The European Union Finance Minister Scott Bsent statement : भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुक्त व्यापार करारावर चर्चा झाली आहे. हा करार आता अंतिम टोक्यात पोहोचला आहे. तर आता लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र या करारामुळे भारतावर अतिरिक्त कर लादणाऱ्या अमेरिकेचा मात्र संताप झाला आहे. यावर अमेरिकेचे अर्थ मंत्री स्कॉट बेसेंट यांनी संताप व्यक्त करणारं विधान केलं आहे.
काय म्हणाले अमेरिकेचे अर्थ मंत्री स्कॉट बेसेंट?
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुक्त व्यापार करारावर चर्चा झाली. त्यामुळे भारताकडे व्यापारासाठीचा मोठा मार्ग खुला झाला असल्याने भारतावर अतिरिक्त कर लादणाऱ्या अमेरिकेचा मात्र संताप झाला आहे. यावर अमेरिकेचे अर्थ मंत्री स्कॉट बेसेंट यांनी या करारावरून युरोपीयन युनियनवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, आम्ही भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावले. पण युरोपीयन युनियनने मात्र भारताशी व्यापार करार करतोय. त्यामुळे हा करार करून युरोपियन यूनियन स्वत: विरूद्धच्या यु्द्धाला अर्थसहाय्य करत आहे. अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
कार्स स्वस्त होणार! युरोपियन युनियनशी करार भारत कारवरील आयात शुल्क 40% पर्यंत कमी करणार
