अमित मालवीय यांनी हाय कोर्टाचा दिलासा, ‘कायद्याची थट्टा करु नका’

Amit Malviya : भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना कर्नाटक हाय कोर्टाने दिलासा दिला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मालवीय यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरला स्थगिती दिली आहे. पोलिसांनी कायद्याची खिल्ली उडवू नये, असे उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी मालवीय यांची बाजू मांडणारे वकील तेजस्वी सूर्य यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून हा निर्णय […]

Amit Malviya

Amit Malviya

Amit Malviya : भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना कर्नाटक हाय कोर्टाने दिलासा दिला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मालवीय यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरला स्थगिती दिली आहे. पोलिसांनी कायद्याची खिल्ली उडवू नये, असे उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी मालवीय यांची बाजू मांडणारे वकील तेजस्वी सूर्य यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून हा निर्णय दिला.

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात ट्विट केल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी अमित मालवीय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. न्यायमूर्तींनी कोर्टरूममध्ये सांगितले की, भाजप नेत्याने केवळ राहुल गांधींविरोधात ट्विट केले होते. यामुळे दोन धार्मिक गटांमध्ये वैर कसे निर्माण होते? पोलिसांनी कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, हे समजण्यापलीकडचे आहे. आणखी तपास झाला तर कायद्याची थट्टा होईल.

पोलिसांनी निदान समोरचे ट्विट तरी बघायला हवे होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. ते फक्त एका पक्षाच्या नेत्याच्या विरोधात होते. यात दोन समाज कुठे आले? राजकीय वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे तेजस्वी सूर्या यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले. त्यांना मालवीय यांना तुरुंगात पाठवायचे आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत न्यायमूर्ती नागप्रसन्ना म्हणाले की, सर्वात मोठे न्यायालयही हे मान्य करते. या कारणास्तव या प्रकरणाचा तपास थांबवणे हे आपले कर्तव्य असल्याचेही ते मानतात. कलम 153A वर न्यायमूर्तींचा विशेष आक्षेप होता.

UCC विधेयक लटकले? पावसाळी अधिवेशनाच्या लिस्टमध्ये नावच नाही

तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 153A ‘धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सौहार्द बिघडवणे’ या प्रकरणात लागू केले जाते. 3 वर्षांपर्यंतच्या कारावासासह दंडाचीही तरतूद आहे.

अमित मालवीय यांचे ट्विट
कर्नाटक पोलिसांनी 17 जून रोजी भाजपविरोधात एफआयआर नोंदवला होता. एफआयआरनुसार, मालवीय यांनी व्हिडिओ ट्विट केला आणि त्यासोबत लिहिले की राहुल गांधी खतरनाक हैं और वह प्रपंच कर रहे हैं। सैम पी जैसे लोग अधिक खतरनाक हैं जो ‘रागा’ का राग अलाप रहे हैं। वो भारत के कट्टर विरोधी हैं। वो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को शर्मिंदा करने के लिए विदेशों में भारत को बदनाम करने में कोई कसर नहीं छोड़ते हैं।

Exit mobile version