UCC विधेयक लटकले? पावसाळी अधिवेशनाच्या लिस्टमध्ये नावच नाही
Monsoon Session 2023 : संसदेच पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच 20 जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार UCC (समान नागरी कायदा) संदर्भात मसुदा सादर करू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीत मांडलेल्या यादीत कुठेही यूसीसीचा उल्लेख नाही. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात समान नागरी संहितेबाबत कोणताही बील येणार नसल्याचे मानले जात आहे.
UCC येण्यास उशीर का?
काही दिवसांपूर्वी विधी आयोगाने UCC संदर्भात लोकांकडून सूचना मागवण्याची मुदत वाढवली होती. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात UCC विधेयक येण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत तेव्हाच मिळाले होते. आता सर्वपक्षीय बैठकीतील यादीमुळे हे विधेयक येणार नसल्याचे अधिक स्पष्ट झाले आहे. या सत्रात UCC व्यतिरिक्त इतरही अनेक महत्त्वाचे विधेयके येणार आहेत.
कठीण परिस्थितीतही सोनिया गांधी खंबीर, ऑक्सिजन मास्क घालून विमान प्रवास
कोणती विधेयके आणली जातील?
दिल्लीच्या अध्यादेशाशी संबंधित विधेयक आणण्याची तयारी सुरू असून त्यावर संपूर्ण देशात गदारोळ पाहायला मिळत आहे. या अधिवेशनात सरकार नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (दुरुस्ती) विधेयक आणणार आहे. त्याचप्रमाणे प्रोव्हिजनल कलेक्शन ऑफ टॅक्स बिल, इंटरनॅशनल मॉनेटरी फंड आणि बँक बिल, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल, पोस्टल सर्विसेस बिल, जन विश्वास बिल, ड्रग्ज, मेडिकल डिव्हाईस आणि कॉस्मेटिक्स बिल यांचा समावेश आहे.
NDA vs INDIA ; विरोधी पक्षांच्या ‘INDIA’नावावर आक्षेप, दिल्ली पोलीसात तक्रार
मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी
तसे, या अधिवेशनात सरकारने मणिपूर हिंसाचारावरही चर्चा करावी अशी विरोधकांची इच्छा आहे. यावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरकार चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहे, स्पीकरने परवानगी दिल्यास त्यावरही चर्चा होईल, असे सांगितले आहे. दोन महिन्यांनंतरही मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. रोज एक ना एक हिंसक घटना समोर येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही काही दिवसांपूर्वी राज्याचा दौरा केला होता. अशा स्थितीत विरोधकांसाठी हा मोठा मुद्दा आहे.