Amit Shah on Rahul Gandhi : नरेंद्र मोदींनी 2014 पासून 2023 पर्यंतच्या 9 वर्षात नव्या राजकीय युगाची सुरुवात केली. गेल्या तीस वर्षात देशाचे राजकारण भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाने नासावले होते. अशा राजकारणाला कंटाळलेल्या जनतेने मोदींना जनादेश दिला. भारताच्या लोकशाहीला या तीन भस्मासूरांनी घेरलं होतं. नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण संपवून गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर केला.
आतापर्यंत 27 अविश्वास प्रस्ताव आणि 11 विश्वास प्रस्ताव या सभागृहात दाखल करण्यात आले आहेत. अनेक वेळा सरकार अल्पमतात आहे असं वाटतं तेव्हा विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव दाखल करतात. काही वेळा मोठे आंदोलन उभारले जाते त्यावेळी लोकांच्या भावाना लक्षात घेऊन असा प्रस्ताव दाखले केला जातो. पण हा अविश्वास प्रस्ताव असा आहे की यामध्ये जनता आणि सभागृह या दोघांनीही सरकारविषयी विश्वास वाटतो, असे अमित शहा यांनी म्हटले.
हा अविश्वास प्रस्ताव जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारा आहे. मला विरोधकांना एवढेच सांगायचे आहे की अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर सरकारच्या विरोधात मुद्दे मांडले जातात. या प्रस्तावावर चर्चा करताना काही मुद्दे तरी मांडायचे होते. मी सर्वाची भाषणं ध्यान देऊन ऐकली पण यातून एकच निष्कर्ष निघाला की जनतेला संभ्रमीत करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. ही जनतेची मागणी नव्हती, असे अमित शहा यांनी म्हटले.
Nana Patole : राजकीय गुरु, करप्ट पार्टी म्हणत मोदींनीच पवारांचा पक्ष फोडण्याचं पाप केलंय; पटोलेंचा पलटवार
सरकार अल्पमतात आहे याचा काही प्रश्नच नाही. सरकारला समर्थन देणाऱ्या खासदारांची संख्या अधिक दिसून येते. जनतेला पण विश्वास आहे. देशातील 60 कोटी गरीबांना मोदी सरकारने संजीवनी दिली आहे. काँग्रेसचे 35 वर्षे लागातार सरकार होते. कोणत्याही सरकारचे तीन-चार निर्णय इतिहासात लक्षात ठेवले जातात पण मोदी सरकारचे 9 वर्षात 50 असे निर्णय आहेत जे युगानयुगे लक्षात ठेवले जातील, असे अमित शहा यांनी म्हटले.
संसद टीव्हीवर फक्त 4 मिनिटे दिसले राहुल गांधी! कॉंग्रेस खवळली
मी देशातील अनेक भागात जात असतो. जनतेमध्ये गेल्यावर, त्यांच्याशी संवाद साधल्यावर सरकारविषयी त्यांच्या मनात अविश्वास असल्याचे थोडं देखील जाणवत नाही. स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशातील जनतेला पंतप्रधान आणि सरकारबद्दल विश्वास वाटतो आहे. पूर्ण बहुमताने दोन वेळा एनडीएचे सरकार जनतेने निवडून दिले आहे, असे अमित शहा यांनी सभागृहात सांगितले.