Nana Patole : राजकीय गुरु, करप्ट पार्टी म्हणत मोदींनीच पवारांचा पक्ष फोडण्याचं पाप केलंय; पटोलेंचा पलटवार

Nana Patole : राजकीय गुरु, करप्ट पार्टी म्हणत मोदींनीच पवारांचा पक्ष फोडण्याचं पाप केलंय; पटोलेंचा पलटवार

Nana Patole on PM Modi : शरद पवार यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची बदनामी आणि त्यांचा पक्ष फोडण्याचे पाप नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना पंतप्रधान पदापासून दूर ठेवल्याचा आरोप करत कॉंग्रेसवर टीका केली होती. त्यावर आता पंतप्रधान मोदींवर कॉंग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. (Nana Patole Criticize PM Modi for Statement about Sharad Pawar PM Post congress )

Gmail यूजर्संना खुशखबर! आता मोबाईलवर लॅग्वेज ट्रान्सलेशनचा पर्याय

काय म्हणाले नाना पटोले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोदींच्या भारतीय जनता पक्षाने कायमच शरद पवार यांच्यावर खोटे-नाटे आरोप करून त्यांची बदनामी करण्याचे काम केले. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून शरद पवारांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला आणि तेच नरेंद्र मोदी आज शरद पवारांविषयी फार कळवळा असल्याचे दाखवून मगरीचे अश्रू ढाळत आहेत.

संसद टीव्हीवर फक्त 4 मिनिटे दिसले राहुल गांधी! कॉंग्रेस खवळली

तसेच शरद पवार हे आपले राजकीय गुरु आहेत. असे मोदी म्हणतात यांना दुसरीकडे त्याच पवारांच्या राष्ट्रवादीला नॅशलिस्ट करप्ट पार्टी म्हणत 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करुन बदनामी करतात. त्याच शरद पवारांचा पक्ष फोडतात आणि वरून त्यांचा फार कळवळा आहे हे दाखवण्यासाठी मगरीचे अश्रू ढाळतात यावरून पंतप्रधानांचे खायचे आणि दाखवायचे दात किती वेगळे आहेत हे दिसून येते असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

तसेच पुढे ते म्हणाले की, काँग्रेस पक्षात विविध जाती धर्मांच्या लोकांना संघटना व सत्तेत महत्वाची पदे दिली जातात. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, तसेच लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षाही काँग्रेस पक्षानेच दिलेल्या आहेत. पंतप्रधानपदाची संधी चालून आलेली असतानाही त्या सर्वोच्च पदाचा त्याग करून काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी डॉ. मनमोहनसिंह यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदांसह मुख्यमंत्रीपदावर दलित, वंचित, मुस्लीम समाजातील व्यक्तींना संधी काँग्रेसने दिलेली आहे. याउलट संघ आणि भाजपामध्ये ठराविक वर्गाच्या लोकांना पदे दिली जातात. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी भाजपातील घराणेशाहीचा अभ्यास करावा आणि मग बोलावे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

भाजपच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर प्रहार केले आणि शरद पवार यांचे कौतुक केले. त्यावरून नाना पटोलेंनी मोदींना प्रत्युत्तर देत जोरदार निशाणा साधला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube