Amit Shah Fake Video Two arrested link with AAP and Congress : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांच्या फेक व्हिडीओ ( Fake Video) प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे जण आप आणि कॉंग्रेसशीसंबंधित ( AAP and Congress ) असल्याचं सांगण्यात येत आहे.
Sudhir Phadke : ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये ‘हे’ मुख्य कलाकार साकारणार ‘या’ व्यक्तिरेखा
या अगोदर दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना देखील याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र आता या प्रकरणामध्ये अहमदाबाद पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली. तर त्या अगोदर आसाम पोलिसांनी देखील एकाला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याजवळ एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आसामा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव रीतोम सिंह आहे.
काय आहे अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरण?
नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, अमित शाह यांनी भाजप जिंकल्यास ते एससी आणि एसटी आरक्षण रद्द करणार आहेत. मात्र हा व्हिडीओ एडीट केल्याचं नंतर समोर आलं. हा व्हिडीओ 2023 चा अमित शाह यांच्या तेलंगणातील भाषणाचा होता. त्यामध्ये त्यांनी मुस्लिम कोटा रद्द करण्याचं म्हटलं होतं.
चालकासोबत भांडण अन् अश्लील व्हिडियोजचा पेन ड्राइव्ह; रेवन्ना सेक्स स्कँडल नेमकं काय?
त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ प्रकरणी भाजपने कॉंग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. भाजपने आरोप केला होता की, निवडणुकीला वेगळ्या वळणावर नेण्यासाठी अशा प्रकारे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.