Amit Shah : गेल्या काही दिवसांपासून संसदेत संविधानावर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान, उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल (Babasaheb Ambedkar) कथित टिप्पणी केली होती. शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने हंगामा केली. त्यानंतर आज गृहमंत्री शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मी आंबेडकरांचा अनुयायी असून, काँग्रेसने (Congress) माझ्या विधानाचा विपर्यास केला, अशी स्पष्टोक्ती दिली.
प्रत्येक घराला सोलर पॅनल अन् भरघोस सबसिडी, प्रधानमंत्री सूर्य घर योजनेंबद्दल जाणून घ्या सर्वकाही
अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी शाह यांनी कॉंग्रेसवर Congress) सडकून टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरांना 1951-52 आणि 1954 मध्ये पराभूत करण्याचे काम कॉंग्रेसनं केलं. भारतरत्न पुरस्काराबाबत बोलायचे झाले तर अनेक वेळा काँग्रेस नेत्यांनी स्वत:ला भारतरत्न पुरस्कार दिला आहे. 1955 मध्ये पंडित नेहरूंनी स्वतःला भारतरत्न देऊन सन्मानित केले. 1971 मध्ये इंदिरा गांधींनीही स्वतःला भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. मात्र, बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न दिला नाही. आंबेडकरांना 1990 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला, त्यावेळी सरकारला भाजपचा पाठिंबा होता, असं शाह म्हणाले.
Video : नौदलाच्या बोटीनं धडक दिली अन् अपघात घडला; मुंबईत नेमकं काय घडलं?
पुढं ते म्हणाले की, कॉंग्रेसने पक्षातील लोकांनाच भारतरत्न दिला. कॉंग्रेसने सत्तेत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही, कॉंग्रेसने कायम आरक्षणाला अन् संविधानाला विरोध केला. मात्र, आरक्षणाला मजबूत करण्यात काम भाजपने केलं, अशा शब्दात त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. मी आंबेडकरांचा अनुयायी असून काँग्रेसने माझ्या विधानाचा विपर्यास केला, असंही शाह म्हणाले.
पुढं शाह म्हणाले, जेव्हा संसदेत चर्चा होते तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे जे काही मांडले जाईल त्याला आधार हवा. तथ्य हवं. काँग्रेस पक्षाने सोमवारपासून वास्तवाची तोडफोड केली. ही बाब निक्षेधार्ह आहे. याचा मी तीव्र निषेध करतो. भाजपच्या वक्त्यांनी संविधान आणि संविधानाच्या मूल्यांवर भाष्य केलं. भाजपच्या वक्त्यांनी संविधानांचं कसं संवर्धन केलं, ते उदाहरणासह सांगितलं. काँग्रेस पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करणारा पक्ष आहे, असं शाह म्हणाले.
कॉंग्रेस संविधान विरोधी पक्ष
ते म्हणाले, कॉंग्रेस संविधान विरोधी पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने वीर सावरकरांचाही अपमान केला. काँग्रेसने आणीबाणी लादून संविधानाची लक्तरं केली. स्त्री सन्मानाचा विषय त्यांनी बाजूला फेकला होता. न्याय व्यवस्थेचा अपमान केला, जेव्हापासून हे सत्य देशासमोर आलं, तेव्हापासून काँग्रेसने सत्याला खोटे ठरवण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न केला आहे, असे शाह यांनी म्हटले आहे.
अमित शहांनी राजीनामा द्यावा- मल्लिकार्जुन खर्गे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा देशात उद्रेक होईल. लोक आंदोलन करतील. बाबासाहेबांसाठी आपले प्राण देण्यास अनेक जण तयार आहेत, असं खर्गे म्हणाले.