Video : नौदलाच्या बोटीनं धडक दिली अन् अपघात घडला; मुंबईत नेमकं काय घडलं?

Video :  नौदलाच्या बोटीनं धडक दिली अन् अपघात घडला; मुंबईत नेमकं काय घडलं?

Mumbai Gateway of India : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी निलकमल फेरीबोट (Nilkamal Boat Accident) समुद्रात उलटल्याची घटना घडलीयं. या प्रवासी बोटीमध्ये तब्बल 80 प्रवासी होते. त्यापैकी एका प्रवाशाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं असून 21 प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय. बोट उलटल्यानंतर कोस्ट गार्डसह मच्छिमारांच्या बोटीच्या सहाय्याने बचावकार्य सुरु असून हेलिकॉप्टरही मदतीसाठी दाखल झाले आहेत. अशातच आता बोट मालकाकडून गंभीर आरोप करण्यात आलायं. नौदलाच्या स्पीडबोटने निलकमल या प्रवासी बोटला धडक दिल्यानेच दुर्घटना घडली असल्याचा आरोप बोटीच्या मालकाने केलायं.

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून समुद्रात बोटीने प्रवास करण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होत असतात. या पर्यटक प्रवाशांना समुद्राची सेहर करण्यासाठी फेरीबोट आहेत. या बोटीमधून पर्यटक समुद्रात फेऱ्या मारतात. समुद्रात निलकमल फेरीबोट प्रवास करीत असतानाच भारतीय नौदलाची एक स्पीडबोटीने धडक दिल्यानेच निलकमल प्रवासी बोट बुडाली असल्याचा आरोप मालकाकडून करण्यात आला आहे.

भाजपसोबत जा पण, सत्तेत राहा, कार्यकर्त्यांचा सूर; भुजबळ नक्की काय करणार?

दुर्घटना घडल्यानंतर मुंबईतील कोस्ट गार्ड, पोलिस, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने प्रवाशांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत 21 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून एका प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याचं समोर येत आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओदेखील समोर आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडालीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube