Amritpal Singh’s wife Karandeep Kaur arrested : काही दिवसांपासून पंजाबमध्ये (Panjab) फरारी घोषित केलेल्या आणि देशभरात वाँटेड (Wanted)घोषित करण्यात आलेल्या खलिस्तानी समर्थक अमृतपालची पत्नी किरणदीप कौर (Kirandeep Kaur)हिला लंडनला (London) जात असताना आज गुरुवारी (दि.20) अमृतसर विमानतळावर (Amritsar Airport) पोलिसांनी (Panjab Police)ताब्यात घेतले आहे.
Gautam Adani शरद पवारांच्या भेटीला; समर्थन केल्यानंतरची पहिली भेट, काय चर्चा झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, किरणदीप कौर अमृतसर विमानतळावरून बर्मिंघमला पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यासाठी ती अमृतसर विमानतळावर पोहोचली होती, मात्र मिळालेल्या माहितीच्या आधारे विमानतळावर आधीच उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. विशेष म्हणजे किरणदीप कौरवर खलिस्तानी समर्थकांना निधी पुरवल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरणदीप सकाळी 11.40 वाजता अमृतसर विमानतळावर पोहोचली होती. ती 1 वाजताच्या फ्लाइटने लंडनला रवाना होणार होती. यादीत त्याचे नाव पाहिल्यानंतर इमिग्रेशनने तीला थांबवले आणि त्याची चौकशी सुरू केली. त्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनाही देण्यात आली होती.
किरणदीप कौर काही संस्थेसाठी ऑनलाइनच काम करते. त्यांचे कुटुंब मूळचे जालंधरचे असले तरी काही दशकांपूर्वी ते लंडनमध्ये स्थायिक झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, किरणदीप तिच्या कुटुंबाजवळ राहण्यासाठी लंडनला जाण्याचा प्रयत्न करत होती. अमृतपाल सिंग यांना पाठिंबा देण्याची हीच वेळ असून ती मागे हटणार नाही, असे किरणदीपने यापूर्वी सांगितले होते.
किरणदीप सिंग सुमारे 28 वर्षांची आहे. ती अनिवासी भारतीय आहे. किरणदीपने लग्नानंतर अमृतपाल सिंगसोबत पंजाबमध्ये राहणार असल्याचे सांगितले होते. आता पोलीस किरणदीपकडून फरार अमृतपालची चौकशी करत आहेत. पोलिसांनी अमृतपालच्या आईचीही चौकशी केली आहे.