Karnataka Assembly Elections result; कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होताना दिसत आहे. कानडी मतदारांनी काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. बहुमताचा आकडा पार करत काँग्रेसने 135 जागांवर आघाडी घेतली आहे. दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये भाजपला (BJP) मोठा दणका बसला आहे. तर काँग्रेसच्या जवळपास 4.4% मतांमध्ये वाढ झाली आहे. भाजपच्या पराभवामध्ये अमूल विरुद्ध नंदिनी वाद (Amul Vs Nandini Controversy) कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीपुर्वी अमूल मिल्क आणि नंदिनी मिल्कवरून राजकारण तापले आहे. अमूल दूधने कर्नाटकात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यावर हा वाद सुरू झाला होता. तेव्हापासून कर्नाटकात अमूलबाबत वाद सुरू झाला आहे. त्यावरुन भाजप विरुद्ध काँग्रेस असा वाद कर्नाटकात सुरु झाला होता.
कर्नाटकातील स्थानिक दूध उत्पादकांनी अमूल दूधला विरोध केला होता. नंदिनी बचाव अशी मोहिम स्थानिकांनी सुरु केली होती. हा वाद विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी सुरु झाला होता. या वादाला राजकीय रंग देण्यात आला होता. आज हाती आलेल्या निकालातून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा बोम्मई सरकारवरचा संताप मतांमध्ये दिसून आला आहे. त्याचा परिणाम बेळगावी, तुमकूर, हसन, म्हैसूर आणि मंड्या या पाच प्रमुख दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये दिसला आहे.
कर्नाटकच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार; विजयांनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया
2023 च्या विधानसभा निवडणुकीत पाच जिल्ह्यांतील 54 जागांपैकी कॉंग्रेसने 29 मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. 2018 साली काँग्रेसला फक्त 14 जागा मिळाल्या होत्या म्हणजेच गेल्यावेळी पेक्षा ही आघाडी 15 जागांनी अधिक आहे. या कृषी पट्ट्यात पारंपारिकपणे चांगली कामगिरी करणाऱ्या जेडीएसने केवळ 11 जागांवर आघाडी घेतली आहे. मागील निवडणुकांपेक्षा 11 जागा कमी आहेत. 2018 च्या तुलनेत भाजप सहा जागांवर पिछाडीवर आहे. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीतही काँग्रेसला सर्वाधिक फायदा झाला आहे.
Karnataka Election : शरद पवारांचे भाजपला खडेबोल! म्हणाले, फोडाफोडी अन् खोक्यांचं राजकारण…
कर्नाटकातील पहिल्या पाच दूध उत्पादक जिल्ह्यांतील 2018 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2023 मध्ये काँग्रेसच्या मतांमध्ये 4.4% गुणांची वाढ झाली, तर जेडीएसच्या मतांची टक्केवारी 5.6% ने घटली आहे. भाजपचे मताधिक्य जवळपास स्थिर राहिले आहे. 2023 मध्ये दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला पसंती मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या पाचही जिल्ह्यांत काँग्रेस आघाडीवर होता. 2018 च्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस 15 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा आणि जेडीएसला अनेक जागांवर धक्का बसला आहे.