Karnataka Election : शरद पवारांचे भाजपला खडेबोल! म्हणाले, फोडाफोडी अन् खोक्यांचं राजकारण…

Karnataka Election : शरद पवारांचे भाजपला खडेबोल! म्हणाले, फोडाफोडी अन् खोक्यांचं राजकारण…

Sharad Pawar on Karnataka Election Result : कर्नाटकात आता भाजपाचा पराभव जवळपास निश्चित (Karnataka Election Results) झाल्याचे दिसत आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यही भाजपाच्या हातातून गेले आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपला कठोर शब्दांत फटकारले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला. निवडणूक प्रचाराच्या काळात केंद्रीय मंत्री व नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचाही त्यांनी समाचार घेतला.

पवार म्हणाले, कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल याची आम्हाला खात्री होती. केंद्र सरकार व भाजपकडून ज्या राज्यात त्यांचे सरकार नाही तेथील आमदार फोडून ते राज्य ताब्यात घ्यायचे असा कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठीच सत्तेचा वापर करणे हे सूत्र त्यांनी वापरले. कर्नाटकातही आधी त्यांनी हेच केलं. येथील लोकनियुक्त सरकार त्यांनी पाडले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी जे केलं तेच तिथे झालं. मध्य प्रदेशातही त्यांनी तेच केलं. गोव्यात बहुमत नसताना आमदार फोडून ते राज्य हातात घेतलं.

https://letsupp.com/national/karnatak-election-2023-bjp-loss-congress-win-46437.html

पण, दुसरीकडे फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण हे लोकांना पसंत नाही याचं उत्तम उदाहरण आपल्याला कर्नाटकच्या निवडणुकीतून मिळालं आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. कर्नाटकात भाजपाचा पराभव करण्याचे जनतेनेच ठरवले होते. त्यामुळे मी तेथील जनतेचे आणि काँग्रेसचे अभिनंदन करतो. त्यांनी भाजपला धडा शिकवला. आता असेच देशभरात होईल.

केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगाल या राज्यात भाजप सत्तेत नाही. बहुसंख्य राज्यात भाजप सत्तेच्या बाहेर आहे. 2024 च्या निवडणुकीत काय चित्र असेल याचा अंदाज कर्नाटकाच्या निवडणुकीत येऊ शकतो, अशा सूचक शब्दांत त्यांनी इशारा दिला.

बजरंग बलीचा मुद्दा उलटला 

पवार पुढे म्हणाले, बजरंग बली की जयचा मुद्दा निवडणुकीत घेण्याचे काहीच कारण नव्हते. अशा मुद्द्यांमुळे एखाद्या वेळी यश मिळू शकते. पण हे लोकांना आवडत नाही. धर्मनिरपेक्षतेवर निष्ठा असल्याची शपथ आम्ही संसदेत घेतली. पण अशी शपथ घेतलेल्या एका महत्वाच्या व्यक्तीनं अशी घोषणा करणं शोभत नाही. ते काम त्यांनी केलं. त्याचं उत्तरही लोकांनी दिलं, असे पवार म्हणाले.

कर्नाटकात कॉंग्रेसची विजयी घोडदौड; डीके शिवकुमार भावूक; म्हणाले, ‘हा अखंड कर्नाटकचा…’

ही तर गृहमंत्र्यांची दमदाटीच 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस सत्तेत आल्यास दंगली होतील असे वक्तव्य केले होते. पवार यांनी या वक्तव्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, गृहमंत्र्यांनी तारतम्य राखून बोलायचे असते. कुणाचेही सरकार असो. देशात कुठेच दंगली होता कामा नयेत. कारण,  त्याची किंमत देशाला आणि सर्वसामान्य माणसाला चुकवावी लागते. अशा प्रकारे वक्तव्य करणे म्हणजे दमदाटीच आहे. लोकांनी त्याचा तीव्र निकाल दिल्याचे पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube