Union budget : यंदाच्या अर्थसंकल्पात तुम्हाला स्वतात काय हवंय?; सरकारला थेट सांगता येणार

आर्थिक वर्षात कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करायचे; MyGov या पोर्टलच्या माध्यमातून पुढे येऊन विचार मांडण्याचे आवाहन.

Untitled Design (141)

Untitled Design (141)

An opportunity to tell the government country’s budget : दरवर्षी अर्थसंकल्प आला की आपण सगळेच आपल्यासाठी या अर्थसंकल्पात काय खास असेल या आशेने टीव्हीसमोर बसलेलो असतो. मात्र देशाच्या अर्थसंकल्पात(Budget) कशाचा समावेश केला पाहिजे हे सरकारला सांगण्याची संधी मिळाली तर? आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 साठी केंद्र सरकारने आता सर्वसामान्यांचे दार ठोठावले आहे. सामान्य नागरिकांचा आवाज त्यात सामील झाल्यावरच विकसनशील भारताचं(India) चित्र बदलू शकतं, असं स्पष्ट मतं सरकारचं आहे. यासाठी अर्थ मंत्रालयाने(Finance ministry) नागरिकांकडून सूचना देखील मागवल्या आहेत. जेणेकरून अर्थसंकल्प कागदी दस्तऐवजांमधून बाहेर काढून वास्तवाच्या जमिनीवर आणता येईल.

MyGov पोर्टलच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचेल तुमचं मत

सरकराने MyGov या पोर्टलच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला पुढे येऊन त्यांचे विचार मांडण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकारच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून जारी करण्यात आलेल्या मेसेजमध्ये यंदाचे बजेट हे जनमतावर आधारित असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. सरकारला पुढच्या आर्थिक वर्षात कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करायचे आहे जे जाणून घ्यायचे आहे. तुम्ही गृहिणी असाल, नोकरदार असाल किंवा विद्यार्थी असाल, तुम्ही MyGov पोर्टलला भेट देऊन तुमचं मत व्यक्त करू शकता.

Video : पार्थ पवारांवर गुन्हा अन् अजित पवारांचा राजीनामा; दमानिया अन् कुंभार आक्रमक

MyGov पोर्टलवर तुमचा मत कस नोंदवाल?

तुमचे मत सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या मोबाईलवर किंवा काँप्युटरवर mygov.in हे पोर्टल उघडा, होमपेजवरच तुम्हाला केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 चा बॅनर किंवा लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक कमेंट बॉक्स उघडेल, जिथे तुम्ही शिक्षण, टॅक्स, रोजगार किंवा महागाई यांसारख्या कोणत्याही मुद्द्यावर तुमची सूचना लिहू शकता. पाहिजे तर तुम्ही MyGov हे अँप देखील डाउनलोड करू शकता आणि या अँपच्या माध्यमातून थेट वित्त मंत्रालयाच्या टीमला तुमची मागणी पाठवू शकता.

आईस्क्रीम कोनचा अध्यक्ष निवडून दाखवा, मल्हार पाटलांचं खासदार ओमराजेंना ओपन चॅलेंज

1 फेब्रुवारी रोजी देशाचा वार्षिक लेखाजोखा

संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याच्या परंपरेनुसार अर्थमंत्री 1 फेब्रुवारीला देशाचा वार्षिक लेखाजोखा मांडतील. मात्र, हा दिवस केवळ एका भाषणाचा नसून, सध्या सुरू असलेल्या सर्व सूचना आणि बैठकांचा सारांश असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन गेल्या काही काळापासून सतत बैठकांमध्ये व्यस्त आहेत. अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत प्रक्रियेअंतर्गत त्यांनी देशातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांशी चर्चा केली आहे.

Exit mobile version