अनंत अंबानींनी तिरुपती बालाजी चरणी केसार्पण केलं; रिलायन्स ग्रुपकडून केली मोठी घोषणा

तिरुपतीमध्ये केसांचे दान करून त्यांनी आपली प्रतिमा, ओळख आणि ऐश्वर्य बाजूला ठेवून देवा चरणी संपूर्ण शरणागती पत्करली.

News Photo   2026 06 28T140857.526

अनंत अंबानींनी तिरुपती बालाजी चरणी केसार्पण केलं; रिलायन्स ग्रुपकडून केली मोठी घोषणा

तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात जाऊन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी आज रविवार दर्शन घेतलं. त्यांनी पहाटेच्या ‘सुप्रभाता सेवे’मध्ये सहभाग घेतला. दर्शनासोबतच, अनंत अंबानी यांनी  केस देवाच्या चरणी अर्पण करत तिरुपती मंदिरात मुंडण केलं.

आपल्या लांब केसांचा त्याग करत, अहंकाराचे समर्पण करून घेतलेले हे रूप सध्या भाविकांमध्ये भक्तीचा एक मोठा संदेश देऊन जात आहे. दर्शनानंतर मंदिरातील रंगनायकुला मंडपम येथे वैदिक विद्वानांनी अनंत अंबानी यांना ‘वेदाशीर्वचनम्’ देऊन आशीर्वाद दिला. तसंच, तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या वतीने त्यांना श्रीवारी तीर्थप्रसाद आणि मानाची रेशमी शाल देऊन सन्मानित करण्यात आलं.

राम मंदिर देणगी वाद : शिर्डी ते तिरूपती बालाजी मोठ्या मंदिरांमध्ये देणग्यांची मोजणी कशी होते?

अंबानी यांनी तिरुपती देवस्थानसाठी एक मोठी घोषणा केली. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देवस्थानला सुमारे २७.५ कोटी रुपये किमतीच्या २५ अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस दान करण्यात येणार आहेत. इतकंच नव्हे तर, या बसेस चालवण्यासाठी लागणाऱ्या ५० ड्रायव्हर्सचा पगार आणि त्यांचे इतर भत्तेही रिलायन्स कंपनीच उचलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय तिरुमलामध्ये या बसेसच्या सुलभ वाहतुकीसाठी आवश्यक ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासही त्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

अनंत अंबानी यांचे लांब केस ही त्यांची एक वेगळी ओळख होती, परंतु तिरुपतीमध्ये केसांचे दान करून त्यांनी आपली प्रतिमा, ओळख आणि ऐश्वर्य बाजूला ठेवून देवा चरणी संपूर्ण शरणागती पत्करली. अनंत अंबानी यांच्यासाठी भक्ती हा कधीच देखावा नसून ती जगण्याची पद्धत राहिली आहे. भगवान श्रीकृष्ण आणि श्रीनाथजी यांच्यावर त्यांची अथांग श्रद्धा आहे. काही महिन्यांपूर्वीच आपल्या लग्नाआधी त्यांनी सर्व सुखसोयींचा त्याग करून द्वारकाधीश चरणी मैलोन्मैल पायी पदयात्रा केली होती.

Exit mobile version