Andhra Pradesh CM Chandrababu Naidu’s Telugu Desam Party Ashok Gajapathi Raju appointed as Governor of Goa : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये गोवा, हरियाणा आणि लद्दाखच्या राज्यपालाच्या नियुक्त केल्या आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जे केंद्रातील एनडीए सरकारमध्ये सहभागी आहेत. त्या चंद्राबाबू नायडू यांच्या पारड्यात आणखी एका पदाची भर पडली आहे. कारण टीडीपीचे नेते पुसापती अशोक गजपती राजू यांना गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
आम्ही बिना हुंड्याचं भाजपसोबत लग्न केलय; अखेर माजी आमदार संजय जगतापांचा प्रवेश ठरला
तसेच प्राध्यपक असीम कुमार घोष यांना हरियाणाचं राज्यपाल करण्यात आलं आहे. त्यांनी बंडारू दत्तात्रय यांची जागा स्विकारली आहे. तर कविंद्र गुप्ता लडाखचे एलजी असणार आहेत. त्यांच्या अगोदर असणाऱ्या उपराज्यपाल ब्रिगेडियर बी डी मिश्रा यांच्या राजीनामा स्विकारण्यात आला. त्यानंतर गुप्ता यांना त्यांच्या जागी जबाबदारी मिळाली आहे.
काँग्रेसला मोठा धक्का, शरद पवारांसह 75 खासदार निवृत्त होणार, राजकारण तापणार
यातील पुसापती अशोक गजपती राजू यांच्याबाबत सांगायचे झाले तर ते पीएस श्रीधरन पिल्लई यांची जागा घेणार आहेत. पुसापती अशोक गजपती राजू हे आंध्र प्रदेशातील प्रतिष्ठीत राजघराण्यात झालेला आहे. 1978 मध्ये राजकारणात प्रवेश करणारे पुसापती अशोक गजपती राजू हे टीडीपीचे ज्येष्ठ नेते आहेत. 16 व्या लोकसभेत मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते.
लोकसंख्या वाढीसाठी पुतीन यांचा अजब फतवा; अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्यास लाखोंचं बक्षीस
दरम्यान गेल्या वर्षी जून महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत आले. मात्र भाजपच्या स्वतःच्या जागांमध्ये मोठी घट झाली. 2019 मध्ये 303 जागांवर असणारा भारतीय जनता पक्ष थेट 240 पर्यंत खाली आला. तर त्याचवेळी आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाचे 16 आणि बिहारमधून जनता दल युनायटेडचे 12 खासदार निवडून आले. आता याच 28 खासदारांच्या पाठींब्यावर एनडीए सरकार सत्तेत आहे. त्यामुळे या पक्षांना खूश ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने होत आहे. याच जोरावर या दोन्ही नेत्यांनी आपल्या राज्यांसाठी अनेक मोठ्या गोष्टी पदरात पाडून घेतल्याचे दिसून येत आहे. त्यात आता नायडू यांच्याकडे राज्यपाल पद देखील आलं आहे.