Anna Hazare angry over Raghav Chaddha’s entry into BJP : आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सात राज्यसभा खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यामध्ये राघव चढ्ढा यांच्या नावाचा देखील समावेश आहे. राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासह अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याचा आपला निर्णय जाहीर केला. त्यांच्या या पक्षांतरावरून ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राघव चढ्ढांवर आण्णा हजारे काय म्हणाले?
राघव चढ्ढां यांच्यासह इतर खासदारांनी आम आदमी पक्षाला रामराम ठोकत भाजपची वाट धरल्यानंतर त्यावर ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.अण्णा हजारे म्हटले की,पक्ष टिकवण्यासाठी आणि तो एकत्र राहण्यासाठी संसदेमध्ये कायदा करणे गरजेचे आहे. कारण लोक सत्ता आणि पैशाच्या लालचेमुळे पक्षांतर करतात.
कैलाश सत्यार्थींना लता दीनानाथ पुरस्कार! मुख्य पुरस्काराबरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही गौरव
मात्र कायदा आल्याने कोणीही मर्जीप्रमाणे पक्षांतर करू शकणार नाही. तसेच आम आदमी पक्षाचा उदय हा आंदोलनातून झाला होता. मात्र स्वार्थ आल्यानंतर लोक सोडून जात आहेत. त्यामुळे समाज आणि देश समोर ठेवून काम केल्यास कोणीही अशा प्रकारे सोडून जाणार नाही. त्याचबरोबर लोकांनी देखील चारित्र्यशील लोकं निवडून दिले पाहिजे. असं म्हणत अण्णा हजारे यांनी राघव चढ्ढा आणि इतर खासदारांच्या पक्षांतरावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान राघव चढ्ढा आणि इतर खासदारांनी राज्यसभेतील पक्षाच्या दहा खासदारांपैकी सात खासदारांनी एकत्रितपणे पक्ष सोडला असून ते भाजपमध्ये विलीन झाले आहेत. राघव चढ्ढा यांच्याव्यतिरिक्त, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम सहानी आणि स्वाती मालीवाल यांनीही आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. ‘आप’साठी सर्वात मोठा धक्का म्हणजे अशोक मित्तल ज्यांची राघव चढ्ढा यांच्या जागी राज्यसभेत उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांनीही पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
तापमानाने मोडले विक्रम! अकोला सर्वाधिक गरम, विदर्भ-मराठवाड्यात उकाड्याचा तडाखा; शाळा सकाळच्या सत्रात
याच बरोबर पक्षाचे संघटन सरचिटणीस आणि सध्या अरविंद केजरीवाल यांचे मुख्य रणनीतीकार असलेले संदीप पाठक यांनीही पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय हितासाठी काम करत नाही. त्याऐवजी, हा पक्ष आता केवळ स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत आहे असं आरोप या पत्रकार परिषदेत बोलताना राघव चढ्ढा यांनी केला.
