Modi government cabinet reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात आज अचानक फेरबदल करण्यात आले आहेत. आधी किरेन रिजिजू आणि आता कायदा राज्यमंत्री एसपी सिंह बघेल (SP Singh Baghel) यांचे मंत्रालय बदलण्यात आले आहे. आता त्यांना आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आले आहे. अर्जुन राम मेघवाल यांची कायदा मंत्रालयात स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने दुसऱ्या राज्यमंत्र्यांचीही बदली करण्यात आली आहे.
मेघवाल सध्या संसदीय कामकाज राज्यमंत्री आणि सांस्कृतिक राज्यमंत्री आहेत. मेघवाल यांना त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एसपी सिंह बघेल यांची कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या जागी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
भाजपसोबत आमचं कधीच जमणार नाही, राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
यापूर्वी किरेन रिजिजू यांच्या जागी संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना कायदा मंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले होते. रिजिजू आता भूविज्ञान मंत्रालयाचा पदभार स्वीकारणार आहेत. न्यायालयीन नियुक्त्यांवरून सर्वोच्च न्यायालयाशी वाद घालणारे रिजिजू 7 जुलै 2021 रोजी कायदा मंत्री झाले. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या राजीनाम्यानंतर क्रीडामंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री असलेले रिजिजू यांना ही जबाबदारी मिळाली होती.