Download App

इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) या सर्वात मोठ्या प्रक्षेपण LVM3 या सर्वात मोठ्या प्रक्षेपण शास्त्राच्या मदतीने ब्रिटनमधील वनवेब ग्रुप कंपनीचे 36 इंटरनेट उपग्रहांचे रविवारी यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या 36 वनवेब उपग्रहांना 450 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत यशस्वीपणे प्रस्थापित केले आहे. हे मिशन वनवेब इंडिया-2 (OneWeb India-2)म्हणूनही ओळखलं जात आहे. ब्रिटनमधील कंपनी वनवेबचे हे 18 वे प्रक्षेपण आहे. श्रीहरीकोटा (Sriharikota)येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या (Satish Dhawan Space Center)दुसऱ्या लॉन्चपॅडवरुन उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. एलव्हीएम-3 ने सलग सहाव्यांदा यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

राहुल गांधींची खासदारकी रद्द, काँग्रेसच्या आंदोलनाची रणनीती ठरली

इस्त्रोची व्यावसायिक शाखा आणि NewSpace India Limited (NSIL) सोबतच्या व्यावसायिक करारांतर्गत वनवेबसाठी हे दुसरे मिशन राबविले आहे. यापूर्वी OneWeb India-1 मिशन, OneWeb, ISRO आणि NSIL यांच्यातील सहकार्याने 23 ऑक्टोबर 2022 ला 36 उपग्रह लो-अर्थ ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते.

तर उर्वरित 36 उपग्रहांचा ताफा रविवारी सकाळी 9 वाजता तामिळनाडूतील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या तळावरुन प्रक्षेपित करण्यात आला. उड्डाणानंतर प्रक्षेपणाने सर्व उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षांमध्ये प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे लव्हीएम3-एम3/ वनवेब इंडिया-2 या मोहिमेची सशस्वी सांगता झाल्याचे इस्त्रोकडून जाहीर करण्यात आले आहे.

एलव्हीएम-3 (LVM3) ने प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांचे एकूण वजन 5 हजार 805 किलो आहे. या प्रक्षेपण वाहनाची उंची 43.5 मीटर आहे. त्याचे लिफ्ट-ऑफ वजन 643 टन होते. या मिशनने सर्व 36 उपग्रहांना यशस्वीरित्या कक्षेत पोहचवल्याने वनवेबकडे आता एकूण 618 उपग्रह आहेत.

Tags

follow us