राहुल गांधींची खासदारकी रद्द, काँग्रेसच्या आंदोलनाची रणनीती ठरली

राहुल गांधींची खासदारकी रद्द, काँग्रेसच्या आंदोलनाची रणनीती ठरली

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली राजघाटावर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले, तर उद्या सोमवारी काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून निषेध नोंदवण्यासाठी संसदेत पोहोचणार आहेत.

याच अनुषंगाने काँग्रेसने विरोधी पक्षांच्या इतर पक्षांनाही काळे कापड किंवा काळे पट्टे घालून संसदेत येण्याचे आवाहन केले आहे. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता विरोधी पक्षांची बैठक बोलावली असून त्यात सोमवारच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.

Uddhav Thackeray यांची सडकून टीका… मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याने लिहिलेले पत्र वाचता येत नाही!

त्याचबरोबर युवक काँग्रेस जंतरमंतरवरही आंदोलन करणार आहे. बैठकीनंतर दुपारी एक वाजता संसदेला घेराव घालण्याचा कार्यक्रम आहे. दुसरीकडे, रविवारी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जंतर-मंतर रस्त्यावर ‘मशाल मिरवणूक’ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

संजय शिरसाटांच्या टिकेला सुषमा अंधारेंचं खरमरीत प्रत्युत्तर

पक्षाचे नेते राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवल्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात ‘संकल्प सत्याग्रह’ केला. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर टीका केली आहे. राहुल गांधींनी ओबीसीचा अपमान केल्याचा भाजप आरोप करत आहे पण खरंतर नीरव मोदी आणि ललित मोदींसारख्या भगोड्यांवर टीका केली जाते म्हणून भाजपला वेदना होतात, असा आरोप खरगे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube