Uddhav Thackeray यांची सडकून टीका… मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याने लिहिलेले पत्र वाचता येत नाही!

Uddhav Thackeray यांची सडकून टीका… मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याने लिहिलेले पत्र वाचता येत नाही!

मालेगाव :  शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुल्तानी दोन्ही संकटे आली. मविआ काळात शेतकऱ्यांना महात्मा फुलेंच्या नावाने कर्जमुक्ती योजना राबविली. सत्ता आल्यावर पहिले काम कर्जमुक्तीचे केले. द्राक्ष बागायदारांना मदत करायची. पिकेल ते विकेल. शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. आज शेतकऱ्यांना भेटलो दागिने गहाण ठेवले. परंतु, नातीचे लग्न लांबले. कृष्णा डोंगरेंच्या रक्ताने पत्र लिहिले पण मुख्यमंत्री वाचून भाषण करतात. पण पत्र वाचता येत नाही, अशी सडकून टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, दिवाळीत मुख्यमंत्री शेतीत रमले. हॅलिकाॅप्टरने शेतात गेले. पण शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. कृषीमंत्री दिसले का? महिलांना शिवीगाळ केली. हे यांचे हिंदुत्व. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या त्यावर कृषीमंत्री अपमानास्पद वक्तव्य करतात. केंद्रीय कृषीमंत्री काहीच करत नाही. मविआने अवकाळी पाऊस झाल्यावर तात्काळ मदत केली. सत्ता गेल्याचे दुख नाही. पण चांगले काम करणारे सरकार गद्दारी करुन पाडले. खंडोजी खोपड्यांची औलाद. गद्दारांना हातात भगवा घेण्याचा अधिकार नाही. तुमची ओळख गद्दारच राहणार आहे.

Uddhav Thackeray यांचा शिंदे गटावर हल्लाबोल : गेल्या वर्षी एक ‘कांदा’ ५० खोक्याला विकला गेला! – Letsupp

उद्योग सावरावा तेव्हा मविआने वीज दरात सवलत. वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीला हलवले. सगळ्यांना मुंबई जवळ होत. पण मिंधे चुप बसले आहेत. उपमुख्यमंत्री म्हणतात कार्यालय नाही नेले आयुक्त फक्त गेले. मग आयुक्त काय फुटपाथवर बसणार आहेत का? मुंबईचे महत्व मारायचे हे कुठले सरकार. निवडणूक आयोगाचा गांडुळ झालयं. खेडची आणि आजची सभा बघितली तर कळेल शिवसेना कुठली आहे. लाखोंच्या संख्येने आपण प्रतिज्ञापत्र दिली ती रद्दी ठेवायला जागा नव्हती म्हणून नाही दिली. होय ही शिवसेना माझ्या वडिलांनी निर्माण केली मिंध्यांच्या वडिलांनी केलेली नाही, असे म्हणत मिंध्ये गटावर उद्धव ठाकरे यांनी हल्ला केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाहीचे भवितव्य वाईट आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील म्हणाले हे सत्तांतर दगड ठेवून घेतलयं. आताचे बावनकुळे म्हणतात आम्ही मिंधे गटाला ४८ जागाच देणार. बावनकुळेंनी नावाप्रमाणे तरी जागा द्यावी. भाजपने जाहीर करावे. मिंधेंना नेते म्हणून निवडणूक लढणार का? तुमची ५२ काय १५२ कुळ आली तरी ठाकरेंपासून तुम्ही दूर नेऊ शकत नाही. तुम्ही मोदींच्या नावाने निवडणूक लढवा मी माझ्या वडिलांच्या नावाने लढतो पण निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा.

(227) Omraje Nimbalkar & Kailas Patil : खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची ‘बदले की आग’ | – YouTube

follow us
  • fb
  • instagram
  • youtube