Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेला कुस्तीपटूंचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. त्यावर आज भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, केलेले सर्व आरोप निराधार असून जनतेमुळे मला पद मिळाले. हे खेळाडूंचे आंदोलन नाही, मी फक्त निमित्त आहे, टार्गेट दुसरं कोणीतरी आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीही मोठं नाही.
यावेळी राजीनाम्याच्या मागणीसवर ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, या कुस्तीपटूंची जुनी विधाने ऐकली तर कळेल की जानेवारी महिन्यात त्यांनी मी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. राजीनामा देणे ही काही मोठी गोष्ट नाही, पण मी तो देणार नाही.
Defamation Case : राहुल गांधींना दिलासा मिळणार? याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी
ते पुढे म्हणाले की, “राजीनामा देणं ही मोठी गोष्ट नाही पण मी गुन्हेगार नाही. मी राजीनामा दिला तर त्याचा अर्थ असा होईल की मी त्यांचे (कुस्तीगीरांचे) आरोप मान्य केले आहेत. माझा कार्यकाळ जवळपास संपत आला आहे. सरकारने 3 सदस्यीय समिती स्थापन केली असून 45 दिवसांत निवडणुका होणार असून निवडणुकीनंतर माझा कार्यकाळ संपणार आहे.” असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
#WATCH | Resignation is not a big deal but I am not a criminal. If I resign, it will mean that I have accepted their (wrestlers') allegations. My tenure is almost over. Govt has formed a 3-member committee and elections will be held in 45 days & my term will end after the… pic.twitter.com/0NL38KCz43
— ANI (@ANI) April 29, 2023
दरम्यान आज काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीही कुस्तीपटूंना भेटण्यासाठी पोहोचल्या. प्रियांका गांधी यांनी विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, ” सरकार सांगत आहे की दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्याची प्रत अद्याप मिळालेली नाही, जेणेकरून त्यात कोणत्या कलमांचा समावेश आहे हे कळू शकेल. एफआयआर नोंदवला असेल तर दाखवावा. या व्यक्तीवर अनेक गंभीर आरोप आहेत. तो व्यक्ती त्या पदावर असताना चौकशी करणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा.”
पालकमंत्री विखेंच्या मध्यस्थीनंतर शिर्डी बंदचा निर्णय मागे, विखेंनी काय दिले आश्वासन ?
दरम्यान भाजपचे खासदार असलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर पॉक्सो आणि खेळाडूंना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महिला खेळाडूंच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.