Iphone Hacking : मागील काही दिवसांपूर्वी देशातल्या मोठ-मोठ्या नेत्यांचे फोन हॅक झाल्याचं समोर आलं होतं. या फोन हॅकिंगच्या प्रकरणाला नवं वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. देशातल्या मोठ्या नेत्यांच्या आयफोनवर अलर्ट मेसेज आल्यानंतर अॅपल कंपनीने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीकडून देण्यात येणाऱ्या धोक्याच्या सूचना चुकीच्या असू शकतात, असं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे.
Government Schemes : कांदाचाळ अनुदान योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं की, राज्य-प्रायोजित हल्लेखोरांना चांगली आर्थिक मदत केली जाते. हल्लेखोरांकडून वेळोवेळी असे हल्ले होत असतात. त्यामुळे अशा हल्ल्यांची माहिती मिळवणे हे गुप्तचर संकेतांवर अवलंबून असते. या अलर्टमागील कारण सांगता येत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
‘द टायगर इफेक्ट’ बॉक्स ऑफिसवर गणपत पलिकडे जाणारा टायगर श्रॉफचा अनोखा प्रवास!
कंपनीच्या स्पष्टीकरणावर केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, देशातील काही लोकांना तक्रार करण्याची सवय लागली असल्याचं ते म्हणाले आहेत. केंद्र सरकार या मुद्द्यावर अत्यंत गंभीर आहे. आम्ही या प्रश्नाच्या तळापर्यंत जाणार आहोत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आम्ही चौकशी करून प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं आहे.
अॅपलने 150 देशांमध्ये ही माहिती प्रसिद्ध केली आहे. Apple कडे कोणतीही माहिती नाही. त्यांनी अंदाजाच्या आधारे लोकांना हा अलर्ट पाठवला आहे. Apple चा दावा आहे की, त्यांचे फोन कोणीही हॅक करू शकत नाही. अॅपलने लोकांपर्यंत अलर्ट का पोहोचले याबाबत आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे विरोधक जो आरोप करू पाहत आहेत, तसे काही नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
Maratha Reservation : ‘…नाहीतर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल’; जाळपोळीवरुन जरांगेंचा कडक इशारा
तसेच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत जे म्हटले आहे त्याला अॅपलने पुष्टी दिली आहे. अॅपलच्या या वक्तव्यानंतर भाजप आयटी सेलचे राष्ट्रीय संयोजक अमित मालवीय यांनीही वक्तव्य केलं आहे. मालवीय म्हणाले, ‘राहुल गांधींनी स्वतःची खिल्ली उडवल्यानंतर काही मिनिटांतच अॅपलने एक निवेदन जारी केले. मागच्या वेळीही राहुल गांधींनी त्यांचा फोन चाचणीसाठी जमा केला नव्हता. फालतू आरोप करून त्यांनी देशाचा वेळ का वाया घालवावा? असं ते म्हणाले आहेत.
Video : मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं; आक्रमक आंदोलकांनी पेटवलं आमदार प्रकाश सोळंकेंचं घर
मालवीय पुढे म्हणाले, ‘राहुल गांधींनी स्वतःची खिल्ली उडवल्यानंतर काही मिनिटांतच अॅपलने एक निवेदन जारी केले. मागच्या वेळीही राहुल गांधींनी त्यांचा फोन चाचणीसाठी जमा केला नव्हता. अॅपलने केवळ भारतातच नाही तर जगभरातील 150 देशांमध्ये अशा सूचना पाठवल्या आहेत. या सर्व अलर्ट मेसेजचे कारण कंपनी स्पष्ट करू शकलेली नाही. अशा स्थितीत यामागे सरकारचा हात आहे, असे विरोधकांनी मानणे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे.
दरम्यान, ज्या विरोधी नेत्यांच्या फोनवर हे अलर्ट मेसेज आले होते, त्यामध्ये महुआ मोईत्रा, शशी थरूर, प्रियंका चतुर्वेदी, अखिलेश यादव, सुप्रिया शिंदे या नेत्यांचा समावेश आहे. या मेसेजनंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत पुन्हा पंतप्रधान मोदी आणि अदानींवर हल्लाबोल केला होता.