Mumbai-Indore : केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) मुंबई आणि इंदूर (Mumbai-Indore) या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या 309 किमी लांबीच्या नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेलसेवने जोडले जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 18,036 कोटी रुपये असून तो 2028-29 या पर्यंत पूर्ण होईल.
स्थापत्य कला अन् काळी, राखाडी दगडं; प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी महाराष्ट्रातील मंदिरं
मुंबई आणि इंदूर ही महत्त्वाची व्यावसायिक केंद्रे आहेत. त्यामुळे आता
मुंबई – इंदूर नवा रेल्वे मार्ग उभारला जाणार असून त्याला केंद्राने मंजुरी दिली आहे. मुंबई ते इंदूर दरम्यानचा रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सहा जिल्हे जोडेल. यामुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान रेल्वे नेटवर्कमध्ये 309 किलोमीटरची भर पडणार आहे. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यांतून आणि मध्य प्रदेशातील बारवानी, खरगोन, धार आणि इंदूर जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यामुळे मनमाड आणि महू ही महत्त्वाची स्थानके जोडली जाणार आहेत.
BB Marathi: संपूर्ण महाराष्ट्रात ‘बिग बॉस मराठी’ची धूम; रितेश देशमुख ठरला नॉन फिक्शनचा सम्राट
यासह मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्हे थेट जोडले जातील, ज्यामुळे देशाच्या उत्तर आणि दक्षिणकेडील भागात त्याचे वितरण सुलभ होईल.
2028 ते 29 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात 30 नवीन स्थानके बांधली जाणार आहेत. नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे 1,000 गावे आणि सुमारे 30 लाख लोकांना जोडेल.
या नवीन रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पर्यटकांना विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांना सहज भेटी देता येणार आहेतय त्यामुळे या भागातील पर्यटन क्षेत्रात लक्षणीय वाढ होणार आहे.
दरम्यान, कृषी उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड, पोलाद, सिमेंट, पीओएल इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग पूर्ण होण्यासाठी पाच वर्षे लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान मोठ्या प्रमाणात थेट रोजगार निर्माण होणार आहे.