Download App

मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; पाच जवान शहीद

वाहन दरीत कोसळून पाच जवान शहीद झाले आहेत. पुँछ भागात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. काही जणांचा शोध सुरू आहे.

  • Written By: Last Updated:

5 soldiers killed as Army vehicle falls into 300 feet gorge: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. वाहन दरीत कोसळून पाच जवान शहीद झाले आहेत. पुंछ भागात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.पुंछ जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरले आणि दरीत कोसळले.वाहन सुमारे 300-350 फूट खोल दरीत पडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात पाच जवान शहीद झाले आहे. तर 8 ते 9 जवान गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, बचावकार्य सुरू असून जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत.

याबाबत भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन ही माहिती दिली. तसेच मृत जवानांबद्दल शोक व्यक्त केला. पुंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना वाहन अपघातात पाच शूर सैनिकांच्या दुःखद मृत्यूबद्दल #WhiteKnightCorps आम्ही शोक व्यक्त करतो. जखमी जवानांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे, असे एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

घटनेच्या ठिकाणापासून सुमारे 130 मीटर अंतरावर त्यांची पोस्ट होती. तर बॅकअप वाहन अवघ्या 40 मीटर अंतरावर होते, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
सहा वाहनांच्या ताफ्यातील एक वाहन पूंँछजवळील ऑपरेशनल ट्रॅकवरून जात असताना सुमारे पावणे सात वाजण्याच्यासुमारास रस्त्यावरून एका दरीत कोसळले.

follow us