Arvind Kejariwal go to jail after defeat in Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती (Delhi Assembly Elections 2025) आले आहेत. भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे. दिल्लीकरांच्या मनात नेमकं काय होतं याचा अंदाज अखेर समोर आला. आम आदमी पक्षाचे दिग्गज नेतेही या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री अतिशी मार्लेना पिछाडीवर पडले आहेत. जंगपूरा मतदारसंघातून दिग्गज नेते मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. मात्र पराभवानंतर देखील केजरीवालांच्या अडचणी संपलेल्या नाही. कारण त्यांना भ्रष्टाचारांच्या आरोपांखीली पुन्हा एकदा जेलमध्ये जावे लागू शकणार आहे.
काँग्रेसचं ठरली भाजपची ‘बीट’ टीम; तब्बल तेरा जागांवर आपचे उमेदवार पाडले
दरम्यान केजरीवालांचा पराभव होताच प्रशासनाने सरकारी कागदपत्र डेटा सुरक्षेच्या कारणास्तव अधिकाऱ्यांना दिल्ली सचिवालयात पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीमध्ये होणारा सत्ता बदल पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणे करून सचिवालयातील दस्तावेज आणि डेटा सुरक्षित ठेवला जाईल. या मागे आप सरकारकडून झालेल्या विविध गैरव्यवहारांची देखील पार्श्वभूमी विचारात घेतली जात आहे.
अण्णाही अनेक वर्ष ‘आप’दे मध्ये अडकले; आपला फटकारताना मोदींकडून आण्णा हजारेंचाही उल्लेख
त्यामुळे केजरीवाल सरकारने आपने केलेल्या विविध गैर व्यवहार आणि कारभारांची पुन्हा एकदा यादी बाहेर येऊ शकते. तसेच दिल्लीतील निवडणुकांच्या निकालावर बोलताना भाजपने त्या स्मृती इराणी म्हटल्या की, केजरीवाल्यांना आता पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागू शकतो. दुसरीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस अगोदरच दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला होता.
दिल्लीत काँग्रेसची झिरोची डबल हॅट्रिक, स्वत: सह मित्रपक्षांना बुडवलं; मोदींनी कॉंग्रेसलाही सुनावलं
आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे एसीबीची टीम दाखल झाली होती. 4 सदस्यांचं पथकाकडून त्यांच्या घरी पोहचले. त्यामुळे त्यांच्या घराबाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी भाजपवर आमच्या 7 आमदारांना 15 कोटींची ऑफर दिली, असा आरोप केला होता. त्यासंदर्भात तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी एसीबीकडून त्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानुसार एसीबीची टीम आप नेते संजय सिंह आणि मुकेश अहलावत आणि अरविंद केजरीवाले घरी पोहोचली होती.
मात्र यावेळी आपचे कायदेशीर सेलचे प्रमुख संजीव नासियार म्हणाले की, एसीबीकडे कोणतीही कायदेशीर नोटीस नाही. त्यांना तपासाचे कोणतेही अधिकार आहेत. मात्र यावेळी एसीबीकडून आमच्याकडे तक्रार आणि आपच्या दाव्यांचे पुरावे आहेत. मात्र त्यांना आपच्या कायदेशीर टीमसोबतच संवाद साधता आला. तसेच आपने त्याबाबत तक्रार करणार असल्याचं म्हटलं.