काँग्रेसचं ठरली भाजपची ‘बी’ टीम; तब्बल तेरा जागांवर आपचे उमेदवार पाडले

  • Written By: Published:
काँग्रेसचं ठरली भाजपची ‘बी’ टीम; तब्बल तेरा जागांवर आपचे उमेदवार पाडले

Delhi Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election Results 2025) भाजपने जबरदस्त विजय मिळविलाय. भाजपने (BJP) 70 पैकी तब्बल 48 जागा जिंकत दिल्ली ताब्यात घेतली आहे. आपला (AAP) केवळ 22 जागा जिंकता आल्या आहेत. तर देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेस (Congress) खातेही उघडू शकले नाहीत. आपच्या पराभवाचे वेगवेगळे कारणेही सांगितले जात आहे. परंतु निवडणुकीत आप आणि काँग्रेसची आघाडी झाली असती तर चित्र हे वेगळे ठरले असते. कारण काँग्रेसचा एकही उमेदवार जिंकला नसला तरी आपच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे काम आहे.

राजकारण बदलायला आलेल्या कट्टर बेइमान आपदेचा पराभव; पंतप्रधान मोदींचा विजयानंतर हल्लाबोल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे बहुमत मिळाले आहेत. तर दहा वर्षांपासून दिल्लीवर सत्ता गाजविणाऱ्या आपला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच आपचे प्रमुख नेते व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक मंत्र्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक जणांच्या पराभव हा केवळ काँग्रेसच्या उमेदवारामुळे झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचा सुपडासाफ झाला असला तरी 70 पैकी चौदा जागांवर काँग्रेसमुळे भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. निवडणुकीत आघाडी होऊ न शकल्याचा हा फटका असल्याचे बोलले जात आहे. त्यावरून आता एकमेंकावर टीका सुरू झाली आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली. एकमेंकाविरोधात आणखी लढत राहा, असा टोमणा अब्दुल्ला यांनी दोन्ही पक्षांना लगावला आहे. दोन्ही पक्षामध्ये आघाडी झाली असती तर दिल्लीची विधानसभा इंडिया आघाडीकडे आली असतील. आकडेवारीचा उल्लेख केला तर अब्दुल्ला यांचे म्हणणे खरे ठरत आहे. दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर चौदा जागांवर आपचा विजय झाला असता. अजूनही एखादी जागा निवडून आली असती तर आप व काँग्रेस आघाडी सत्तेत आली असती.

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित रंगला ‘हिंदू गर्जना चषक’ राजस्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार !

संगमविहार ही जागा आप केवळ 344 मतांनी हारली आहे. तर त्रिलोकपुरी जागेवर 392 मतांनी आपचा उमेदवार पराभूत झाला. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे केवळ 675 मतांनी पराभूत झाले. तर तिमारपूर येथील जागाही आपला केवळ 969 मतांनी गमवावी लागली. नवी दिल्ली येथे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चार हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. येथे काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांना पाच हजारपेक्षा जास्त मते मिळाली. दोन्ही पक्ष एकत्र असते तर केजरीवाल हे पराभूत झाले नसते. इतर आठ जागांवर चार ते दहा हजार मतांचा फरक आहे.

ममता व अखिलेश यादवांचा प्रचारही फिका
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केजरीवाल यांची साथ दिली आणि त्यांनी दिल्लीत येऊन प्रचारही केला. परंतु त्याचाही मोठा असा काही परिणाम झाला नाही. परंतु केवळ काँग्रेसच एकटी लढली. त्यात काँग्रेसला खासही काही करता आले नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube