राजकारण बदलायला आलेल्या कट्टर बेइमान आपदेचा पराभव; पंतप्रधान मोदींचा विजयानंतर हल्लाबोल
![राजकारण बदलायला आलेल्या कट्टर बेइमान आपदेचा पराभव; पंतप्रधान मोदींचा विजयानंतर हल्लाबोल राजकारण बदलायला आलेल्या कट्टर बेइमान आपदेचा पराभव; पंतप्रधान मोदींचा विजयानंतर हल्लाबोल](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/PM-Modi-2_V_jpg--1280x720-4g.webp)
PM Modi on Delhi Assembly Elections Victory : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी केजरीवाल यांना टोला लगावताना म्हटलं की, दिल्लीतील जनतेने दहा वर्षाच्या अपदेपासून दिल्ली मुक्त झाली आहे. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. अहंकार, अराजकता आणि दिल्लीवर आलेल्या आपदेचा पराभव झाला आहे. दिल्लीची मालक केवळ येथील जनता आहे मात्र ज्यांना दिल्लीचा मालक असल्याचा गर्व होता आहे असं वाटत होतं त्यांना पराभूत केलं. असं म्हणत मोदींनी संबोधित केलं.
भाजपने अयोध्याचाही वचपा काढला… खासदार पुत्राला 50 हजाराने लोळवलं!
विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून दिल्लीकरांना प्रणाम!
यावेळी पुढे बोलताना मोदी म्हणाले दिल्लीकरांनी मला कधीही नाराज केलं नाही. मोदीच्या गॅरंटीवर विश्वास ठेवणाऱ्या दिल्लीकरांना माझा प्रणाम. जनतेने दिल्लीला आपदा मुक्त केलं. त्यामुळे आता दिल्लीत विकास आणि विश्वासाचा विजय झाला. डबल इंजिन सरकार दिल्लीचा डबल विकास करणार, एनडीए म्हणजे सुशासनची गॅरंटी, महिलांना दिलेलं आश्वासन पूर्ण करणार, दिल्लीला आधुनिक शहर बनवणार असल्याचं अश्वासन मोदींनी यावेळी दिलं.
आण्णाही अनेक वर्ष ‘आप’दे मध्ये अडकले; आपला फटकारताना मोदींकडून आण्णा हजारेंचाही उल्लेख
तसेच ते म्हणाले की, राजकारण बदलण्यासाठी आलेल्या भ्रष्टाचारी कट्टर बेईमानांचा पराभव केला. हरियाणा, महाराष्ट्रनंतर दिल्लीत भाजपचा नवा इतिहास घडला आहे. खरी मालक जनता मालक बनण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना घरी बसवलं. अगोदरच्या सरकारने शहरीकरणाच्या नावाखाली वैयक्तिक विकास केला आण्णा हजारे देखील अनेक वर्षांपासून या ‘आप’दा मध्ये अडकले होते. जग कोरोनाशी लढत असताना आप मात्र शीशमहल बनवण्यात व्यस्त होते. स्वतःचे घोटाळे लपवण्यासाठी रोज नवनवीन योजना आणल्या.