दिल्लीत काँग्रेसची झिरोची डबल हॅट्रिक, स्वत: सह मित्रपक्षांना बुडवलं; मोदींनी कॉंग्रेसलाही सुनावलं
![दिल्लीत काँग्रेसची झिरोची डबल हॅट्रिक, स्वत: सह मित्रपक्षांना बुडवलं; मोदींनी कॉंग्रेसलाही सुनावलं दिल्लीत काँग्रेसची झिरोची डबल हॅट्रिक, स्वत: सह मित्रपक्षांना बुडवलं; मोदींनी कॉंग्रेसलाही सुनावलं](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2024/10/Pm-Narendra-Modi_V_jpg--1280x720-4g.webp)
PM Modi on Congress after Delhi Assembly Elections Victory : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्यासह कॉंग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसला देखील कडक संदेश दिला आहे.
सत्ता म्हणजे अहंकार नाही, तर लोकांच्या समस्या सोडविण्याचा मार्ग; सुमित्रा महाजन
दिल्लीतील निवडणुकांमध्ये काँग्रेसने झिरोची डबल हॅट्रिक केली आहे. देशाच्या राजधानी मध्ये देशातील सर्वात जुन्या पक्षाचा सातत्याने सहाव्यांदा खातही उघडलेलं नाही. आणि ते स्वतःला पराजयाचा गोल्ड मेडल देत आहे मात्र सत्य हे आहे की काँग्रेसवर देश अजिबात विश्वास ठेवायला तयार नाही. मागच्या वेळी म्हटल्याप्रमाणे काँग्रेस एक परजीवी पक्ष बनला आहे जे स्वतःही बुडत आहे आणि जे सोबत येतील त्यांनाही बुडवत आहे. त्यामुळे काँग्रेसचे एकामागे एक मित्रपक्ष नष्ट होत आहे. तसेच ते आपल्या मित्र पक्षाच्या वोट बँकेवर डोळा ठेवतात. असं म्हणत त्यांनी कॉंग्रेसला सुनावलं आहे.
राजकारण बदलायला आलेल्या कट्टर बेइमान आपदेचा पराभव; पंतप्रधान मोदींचा विजयानंतर हल्लाबोल
दरम्यान अरविंद केजरीवाल पराभूत, मनिष सिसोदिया पराभूत, सौरभ भारद्वाज पराभूत… आम आमदी पक्षाच्या (AAP) दिग्गज नेत्यांचा पराभूत करत भाजपने (BJP) दिल्लीच्या सत्तेत थाटात पुनरागमन केले आहे. 70 पैकी 48 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या विजयासह भाजपचा तब्बल 27 वर्षांचा वनवास संपुष्टात आला आहे. यापूर्वी 1993 मध्ये भाजपने दिल्लीची निवडणूक जिंकली होती. त्यावेळी पाच वर्षात मदनलाल खुराणा, साहिब सिंह वर्मा आणि सुषमा स्वराज भाजपच्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या.
1998 मध्ये मात्र काँग्रेसने निवडणूक जिंकली आणि त्यानंतर 2003, 2008 या निवडणुकीतही काँग्रेस सत्ता कायम राखली. 1998 ते 2013 असे 15 वर्षे काँग्रेसच्या शिला दिक्षीत मुख्यमंत्री राहिल्या. 2013, 2015 आणि 2020 या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने सहज विजय मिळवला होता. 2013 पासून दिल्ली म्हणजे ‘आप’ आणि अरविंद केजरीवाल असे अलिखित समीकरण तयार झाले होते. परंतु, यंदा भाजपने दिल्ली विजय मिळवण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती. देशभरातील भाजपचे आमदार, खासदार, भाजपशासित राज्यांमधील मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह पंतप्रधानही मैदानात उतरले होते. अशात आता निकालात भाजपने सरशी मारली आले आहे.