Download App

Arvind Kejariwal: केंद्र सरकाकडून केजरीवालांच्या अटकेचा कट, आपचा आरोप

Arvind Kejariwal notice for Delhi Excise Policy : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी सीबीआयने नोटीस बजावली आहे. यानुसार त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सीबीआयची नोटीस मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेतली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार अरविंद केजरीवाल यांनी जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे. हा भाजपचा कट आहे. पण आम्ही घाबरणार नाही. केजरीवाल 13 दिवस उपोषण करत भ्रष्टाचारांविरोधात लढले होते. तर पंतप्रधानांनी आपल्या मित्रांसोबत जो घोटाळा केला आहे. तो लोकांसमोर आणावा. अरविंद केजरीवालांच्या दिल्ली विधानसभेतील वक्तव्यामुळे त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असंही यावेळी संजय सिंह म्हणाले.

Manish Sisodiya : आपल्या पंतप्रधानांना कोणी पण गंडवतं; जेलमधून सिसोदियांचा मोदींवर हल्लाबोल

याअगोदर सीबीआयने याच मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची 26 फेब्रुवारीला 8 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या तिहार जेलमध्ये आहेत. अगोदर ते 7 दिवस पोलीस तर त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags

follow us