Arvind Kejriwal : केजरीवाल यांची अशीही “गांधीगिरी”, आज दिवसभर करणार ध्यान, कारण…

केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिल्ली सरकारमधील लोकांना अटक होत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गांधीगिरी करत लक्ष वेधून घेतलं आहे. अरविंद केजरीवाल हे आज सकाळपासून ध्यानधारणेला बसले आहेत. त्यांचं हे ध्यान काही मिनिट नाही तर तब्बल सात तास चालणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना काही दिवसापूर्वी सीबीआयकडून अटक करण्यात आली […]

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal

केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिल्ली सरकारमधील लोकांना अटक होत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गांधीगिरी करत लक्ष वेधून घेतलं आहे. अरविंद केजरीवाल हे आज सकाळपासून ध्यानधारणेला बसले आहेत. त्यांचं हे ध्यान काही मिनिट नाही तर तब्बल सात तास चालणार आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना काही दिवसापूर्वी सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. त्याचा निषेध म्हणून अरविंद केजरीवाल ध्यान करत आहेत. केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “दिल्लीत शाळा आणि रुग्णालय तयार करणाऱ्यांना पंतप्रधान जेलमध्ये पाठवत आहेत, आणि कोट्यवधी रुपये लुटणाऱ्यांना जवळ करत आहेत”

हेही वाचा : मद्य धोरणप्रकरणी केसीआरची मुलगी कविता अडचणीत; ईडीकडून चौकशी होणार

संपूर्ण देशासाठी ध्यानधारणा

ध्यानाला बसण्यापूर्वी केजरीवाल म्हणाले की, “मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे धाडसी नेते आहेत. देशासाठी ते प्राणही देऊ शकतात. पण आज देशातील स्थितीबाबत मला चिंता वाटतेय.” त्याचबरोबर होळीनंतर मी संपूर्ण देशासाठी ध्यानधारणा करेल, असं केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

दरम्यान दिल्ली मद्य धोरण घोटाळा (Delhi Liquor Scam)प्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) तिहार तुरुंगात आहेत. आता या घोटाळ्यात ईडीनं तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांची मुलगी आणि विधान परिषद सदस्य के कविताला (K Kavita) समन्स पाठवलंय. ईडीनं(ED) 9 मार्चला कविताला चौकशीसाठी बोलावलंय. दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं (CBI) मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती.

कविता या दक्षिण गटाच्या प्रतिनिधींपैकी एक आहे, ज्यांच्यावर आपच्या नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे, त्यांच्यापैकी कविता एक आहेत. मंगळवारी अटक केलेल्या हैदराबाद येथील व्यापारी अरुण पिल्लई सोबतच कविताचीही चौकशी होणार आहे.

Exit mobile version