Arvind Kejriwal Arrest : दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडी कोठडीत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी (Arvind Kejriwal Arrest) मोठा झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवालांनी दिलासा (Delhi Liquor Scam) देण्यास नकार दिला. केजरीवाल यांनी अबकारी धोरण प्रकरणातील अटकेला न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेला न्यायालयाने फेटाळून लावले तसेच केजरीवाल यांची अटक वैध असल्याचे म्हटले. सध्या अरविंद केजरीवाल 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत. केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ही याचिका फेटाळली. हा काही जामिनाचा प्रकार नाही. अटकेला आव्हान आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर ईडी कोठडीला अवैध ठरवले जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची रिस्क भाजपला फायद्याची की तोट्याची?
या प्रकरणी न्यायालयाने म्हटले की ईडीचा युक्तिवाद आहे की आतापर्यंतचे पुरावे केजरीवाल हे निमंत्रक असल्याचे दाखवतात. गोवा निवडणुकीत 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यानंतर केजरीवाल यांच्या वकिलाने याला विरोध केला आणि शरथ रेड्डी आणि राघव मुंगटा यांच्या वक्तव्यांचा संदर्भ दिला. सरकारी साक्षीदार होण्याचा निर्णय कोर्टाकडून घेतला जातो तपास यंत्रणांकडून नाही.
आरोपींनुसार तपास होऊ शकत नाही. न्यायालयाचा राजकारणाशी काहीच संबंध नाही तसेच मुख्यमंत्र्यांसाठी सुद्धा कोणत्याच विशेषाधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दिल्लीचे मुख्यमंत्र्यांनी याचिकेत यंत्रणांनी केलेल्या अटकेच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केला होता. लोकशाही निष्पक्ष निवडणुका आणि समान संधी यांसह संविधानाच्या मुलभूत रचनेचे उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हटले होते.
ईडीने याचिकेला केला तीव्र विरोध
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या या याचिकेला विरोध केला. केजरीवाल निवडणुकीच्या आधारे अटकेपासून संरक्षणाचा दावा करू शकत नाही कारण कायदा त्यांना आणि कोणत्याही सामान्य नागरिक यांच्यासाठी समानपणे लागू होतो. असे ईडीने न्यायालयात म्हटले.
Delhi Liquor Scam: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सात दिवसांची ईडी कोठडी
याआधी ईडीने प्रदीर्घ चौकशीनंतर 21 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. यानंतर ईडीने 22 मार्च रोजी कनिष्ठ न्यायालयात हजर केले. यानंतर न्यायालयाने त्यांना 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठही सुनावली होती. 1 एप्रिल रोजी न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत केजरीवालांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. सध्या अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत.