Download App

के. कवितांनी एक वाक्य सांगताच केजरीवालांना ED नं उचललं, साऊथ लॉबीशी नेमकं कनेक्शन काय?

  • Written By: Last Updated:

Arvind Kejriwal Arrest News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal मद्य घोटाळा प्रकरणात चांगलेच अडकल्याचं दिसून येतं. गुरुवारी (दि. २१ मार्च) संध्याकाळी ईडीच्या (ED) एका पथकाने केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सध्या ते ईडीच्या ताब्यात आहे. दरम्यान, ईडीने त्यांना कटकारस्थानी म्हटलं.

तू अॅक्शनचा बाप आहेस, Vedaa निमित्त शर्वरीची जॉनसाठी खास पोस्ट! 

प्रेस नोटनुसार, ईडीने सांगितले की, भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेते के. कविता यांनी मद्य धोरण तयार करताना केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्यासोबत कट रचला होता.

अलीकडेच ईडीने के. कविता यांनाही त्यांच्या घरातून अटक करण्यात केली. मद्य घोटाळा प्रकरणात त्यांनी ईडीने अटक केली होती. यानंतर रिमांड दरम्यान झालेल्या खुलाशांच्या आधारे ईडी केजरीवाल यांची चौकशी करत आहे. के. कविता आणि केजरीवाल यांच्यात अबकारी धोरणाबाबत झालेल्या संभाषणाबाबतही ईडी केजरीवाल यांच्याकडून उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

‘गोवा निवडणुकीसाठी ‘आप’ला 45 कोटी; केजरीवालच दारू घोटाळ्याचे ‘किंगपिन’; ED चा दावा 

ईडीच्या हाती काय लागलं?

के. कविता यांच्या अटकेनंतर दिलेल्या निवेदनात ईडीने आरोप केला की, अरविंद केजरीवाल, तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, के. कविता यांच्यासह अनेक ‘आप’ नेत्यांनी हे उत्पादन शुल्क धोरण बनवण्याचा आणि अंमलात आणण्याचा कट रचला. जेणेकरून पॉलिसीच्या नावाखाली करोडो रुपये कमावता येतील.

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाचे साऊथ लॉबी कनेक्शन

यानंतर केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. साऊथ लॉबीने के कविता यांच्या माध्यमातून आलेल्या केजरीवाल यांना १०० कोटी रुपये दिल्याचा दावा ईडीने केला. त्यामुळं केजरीवाल यांच्या अडचणीत झाली. तपास एजन्सीने सांगितले की, मद्य धोरण प्रकरणातील एक आरोपी विजय नायर हा केजरीवाल यांच्या कार्यालयात जात असे आणि तेथेच जास्त वेळ घालवत असे.

नायरने मद्य व्यापाऱ्यांना सांगितले की त्याने केजरीवाल यांच्याशी धोरणाबाबत चर्चा केली होती, तपासकर्त्यांनी सांगितले की नायरनेच इंडोस्पिरिटचे मालक समीर महेंद्रू यांना केजरीवाल यांना भेटण्याची व्यवस्था केली होती. जेव्हा मीटिंग होऊ शकली नाही, तेव्हा त्यांनी महेंद्रू आणि केजरीवाल यांची व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा घडवून आणली.

साऊथ लॉबी प्रकरणातील पहिला आरोपी आणि आता साक्षीदार असलेल्या राघव मागुंटाने सांगितले होते की, मद्य धोरणाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी त्याच्या वडिलांनी केजरीवाल यांची भेट घेतली होती. राघव मागुंटा यांचे वडील बीआरएस खासदार आहेत.

के. कविता कोण आहे?

के. कविता या माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. त्या विधान परिषदेचे आमदारही आहेत. कविता 2014 मध्ये सक्रिय राजकारणात आल्या. यानंतर त्यांनी 2014 मध्ये ‘BRS’ मधून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 2021 मध्ये त्या विधान परिषदेवर निवडून आल्या.

follow us