Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक मोठं विधान केलं. देशातील 22 राज्यांमध्ये भाजपची (BJP) सरकारे आहेत. या राज्यांमध्ये तेथील सरकारांनी वीज-पाणी मोफत दिलं तर दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) मी भाजपचा प्रचार करेल, असं विधान केजरीवाल यांनी केलं. ते रविवारी आयोजित ‘जनता दरबार’मध्ये बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मोठी बातमी! महिला T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 विकेटने धुव्वा उडवला
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये जनता दरबार कार्यक्रमात बोलताना केजरीवाल म्हणाले की, भाजपचे डबल इंजिन खराब होत चालले आहे. एक इंजिन गेल्या जून महिन्यात लोकसभा निवडणुकीनंतर खराब झाले आहे. तर विविध राज्यांतील त्यांची सरकारे जाऊ लागली आहेत. आता येत्या काही महिन्यांत दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे लोक दिल्लीत डबल इंजिन सरकारच्या गप्पा मारतील. हरियाणातही डबल इंजिनचे सरकार होते. मग तेथील लोक यांच्यापासून दूर का जात आहेत? ते यावेळी दिल्लीकरांनी भाजप नेत्यांना विचारावे, असे आवाहन केजरीवाल यांनी जनतेला केले.
ऐन विधानसभेपूर्वी बच्चू कडूंना मोठा धक्का, राजकुमार पटेल सोडणार प्रहारची साथ
पुढं ते म्हणाले, या लोकांचे सात वर्षे उत्तर प्रदेशात डबल इंजिनाचे सरकार आहे. तरीही लोकसभेतील त्यांच्या जागा निम्म्याने कमी झाल्या. गेल्या सात वर्षांपासून या राज्यात दुप्पट लूट सुरू आहे. मणिपूरमध्ये सात वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. मग मणिपूर का जळत आहे? या लोकांना देशाचा मणिपूर करायचा आहे, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.
भाजपच्या गुजरात मॉडेलवर टीका करताना ते म्हणाले, गुजरातमध्ये 30 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. मात्र, या राज्यात एकही शाळा धड नाही, असं केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल जे काम करत आहेत, ते आम्हीही करू, असे भाजप नेते दिल्लीकरांना सांगतील. मात्र 22 राज्यात भाजपची सरकारे आहेत. त्याठिकाणी ते मोफत वीज आणि पाणी का देत नाहीत? त्यांनी ते मोफत करावे. दिल्लीच्या निवडणुकीत मी स्वतः भाजपचा प्रचार करेन, असं आव्हान केजरीवाल यांनी भाजपला दिले आहे.
भाजपमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्र आणि झारखंडसह दिल्लीत नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेऊन दाखवावं, असं केजरीवाल म्हणाले. आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत. अन्यथा भाजपने पराभव स्वीकारावा, असं ते म्हणाले.