मोठी बातमी! महिला T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 विकेटने धुव्वा उडवला

मोठी बातमी! महिला T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 विकेटने धुव्वा उडवला

IND vs Pak : महिला T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (Women’s T20 World Cup 2024) भारतीय महिला संघाने (Team India) पाकिस्तानचा 6 विकेटने पराभव केला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तानचा पराभव केला आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान (Pakistan) संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. भारतीय संघाने पहिल्या पाच ओव्हरमध्ये पाकिस्तानला दोन मोठे धक्के दिले. मात्र त्यानंतर सलामीवीर मुनिबा आणि निदा दार यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना देखील काहीच खास करता आलं नाही. त्यामुळे पाकिस्तानचा संघ केवळ 105 धावा करू शकला. भारताकडून अरुंधतीने 4 ओव्हरमध्ये 19 धावा देत तीन विकेट घेतले तर श्रेयंकाने 4 ओव्हरमध्ये 12 धावा देत दोन विकेट घेतल्या तर रेणुका सिंग, दीप्ती शर्मा आणि शोभना आशा यांनी प्रत्येकी एक- एक विकेट घेतला.

106 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात देखील खराब झाली होती. भारतीय संघाला 18 धावांवर पहिला धक्का बसला. स्मृती मानधनाने 16 चेंडूत 7 धावा केल्या. त्यानंतर शेफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्जने दुसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. शेफालीने 35 चेंडूत 32 धावांची खेळी खेळली तर जेमिमाह रॉड्रिग्जने 28 चेंडूत 23 धावा केल्या. पाकिस्तानकडून फातिमा सनाने 2 तर सादिया इक्बाल आणि ओमामा सोहेल यांनी प्रत्येकी एक – एक विकेट घेतला.

मी सांगितलेली कामे करुन दाखवा; सुजय विखेंचं लंकेंना खुलं चॅलेंज

या विजयानंतर भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. भारतीय संघाला या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या कडून पराभव स्वीकारावा लागला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube