‘माझ्या 5 मागण्या पूर्ण करा, मी राजकारण सोडतो’; केजरीवालांचं भाजपला थेट आव्हान

Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका जवळ येत (Lok Sabha Election 2024) चालल्याने राजकारणाचा पार चांगलाच वाढत चालला आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी हरियाणातील जाहीर सभेत भाजपला थेट आव्हान दिले. आपल्या पाच मागण्या पूर्ण झाल्या तर राजकारणच सोडून देऊ असे […]

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका जवळ येत (Lok Sabha Election 2024) चालल्याने राजकारणाचा पार चांगलाच वाढत चालला आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी हरियाणातील जाहीर सभेत भाजपला थेट आव्हान दिले. आपल्या पाच मागण्या पूर्ण झाल्या तर राजकारणच सोडून देऊ असे केजरीवाल म्हणाले. भाजपला (BJP) सर्वात मोठा धोका आपकडूनच असल्याचेही केजरीवाल म्हणाले.

Lok Sabha 2024 : ‘राष्ट्रवादीने नगर दक्षिण सोडल्यास आम्ही तयार’ राऊतांचं दबावाचं पॉलिटक्स!

हरियाणा येथील जींद येथे केजरीवाल यांनी पाच मागण्यांची यादी जाहीर केली. केजरीवाल म्हणाले, मी येथे सत्तेसाठी किंवा पैसे कमावण्यासाठी आलो नाही. देशातील 140 कोटी जनतेच्यावतीने माझी पहिली मागणी देशाची शिक्षण व्यवस्था सुरळीत करण्याची आहे. देशातील प्रत्येकाला चांगली वागणूक मिळाली पाहिजे, देशातील रुग्णालयांची स्थिती सुधारली पाहिजे. देशातील महागाई कमी झाली पाहिजे. प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि जर गरीबांना मोफत वीज दिली गेली, देशातील प्रत्येकाला 24 तास वीज मिळाली तर मी राजकारण सोडून देईल, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले.

 

Exit mobile version