Download App

उद्या दुपारी आम्ही BJP च्या मुख्यालयात येतोय, हिंमत असेल…; केजरीवालांचं मोदींना आव्हान

, बिभव कुमारच्या यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला (BJP) आव्हान केलं आहे.

Arvind Kejriwal on Modi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांच्यावर कथित मारहणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी त्यांना आज अटक करण्यात आली. स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्या जबाबानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, बिभव कुमारच्या यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला (BJP) आव्हान केलं आहे.

Lok Sabha Polls: महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा, मुंबईत शिंदे विरुद्ध ठाकरे; वाचा महत्वाच्या लढती 

केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. उद्या मी माझ्या अनेक बड्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयावर धडक देणार आहे, कोणा कोणाला तुम्हाला तुरुंगात टाकायचं त्यांना टाका, असं चॅलेज केजरीवालांनी दिलं.

केजरीवाल यांनी उद्या (रविवार) नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयासमोर ‘जेल भरो’ कार्यक्रमाची घोषणा केली. आपचे सर्व नेते उद्या दुपारी 12 वाजता मुख्यालयात जातील आणि त्यांच्या अटकेची मागणी करतील. रोज कोणत्या ना कोणत्या नेत्याला विनाकारण अटक करण्याचा प्रकार सुरू आहे. त्याऐवजी जी काही अटक करायची ती सर्वांना एकदाच करा, अशी मगाणी केजरीवाल यांनी केली.

निवडणुकीत आतापर्यंत 8889 कोटींच्या वस्तू जप्त, रोकड आणि ड्रग्जचा आकडा मोठा

केजरीवाल यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. त्यात ते म्हणाले, मोदी आम आदमी पार्टीच्या मागे कसे लागले, ते आमच्या नेत्यांना कसे तुरुंगात टाकत आहेत? ते तुम्ही पाहत आहात. त्यांनी मला तुरुंगात टाकले, मनीष सिसोदिया , संजय सिंह यांना तुरुंगात टाकलं. सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकलं. आज माझ्या पीएला देखील तुरुंगात टाकण्यात आले. आता ते ऱाघव चढ्ढा जे नुकतेच लंडनहून परतले त्यांनाही तुरुंगात टाकणार असल्यांचं वक्तव्य केजरीवाल यांनी केलं.

ते म्हणआले, असं करून तुम्ही आम आदमी पार्टीला चिरडून टाकाल. पण यामुळे आम आदमी पार्टी संपणार नाही. एकदा सर्वांना तुरुंगात टाकून तर बघा. आम आदमी पार्टी हा एक विचार आहे, जो देशभरातील लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचला आहे. जितक्या आपच्या नेत्यांना तुरुंगात टाकाल, तितके शेकडो नेते हा देश तयार करेल, असं केजरीवाल यांनी म्हटलं.

मला आश्चर्य वाटते की ते आम्हाला तुरुंगात का टाकत आहेत, आमचा काय दोष आहे? दिल्लीत आम्ही चांगल्या सरकारी शाळा बांधून गरीबांच्या मुलांना चांगले शिक्षण दिले हा आमचा दोष आहे का? मोदीजी हे करू शकत नाही, म्हणून आमची कामं ते थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही दिल्लीत मोहल्ला क्लिनिक सुरू केलं आहे, मोदीजीमोफत उपचार देऊ शकत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

दिल्लीत 24 तास मोफत वीज आम्ही देतोय, ती मोफत वीज यांना यांना बंद करायची आहे, यासाठीच ते आम्हाला तुरुंगात टाकत आहेत, अशी टीकाही केजरीवाल यांनी मोदींवर केली.

follow us

वेब स्टोरीज