मोफत वीज, मोफत शिक्षण, पिकांनाही हमीभाव…; अरविंद केजरीवालांनी दिल्या 10 गॅरंटी

मोफत वीज, मोफत शिक्षण, पिकांनाही हमीभाव…; अरविंद केजरीवालांनी दिल्या 10 गॅरंटी

Arvind Kejriwal Announced Ten Guarantees : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवा (Arvind Kejriwal) यांना कथित दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरूवात केली. आज अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या 10 गॅरंटी जाहीर केल्या आहेत.

मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी, नियम मोडल्यास कडक कारवाई 

अरविंद केजरीवाल यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत, यात अग्निवीर योजना बंद केली जाईल, दिल्ली-पंजाबसारखी 200 युनिटपर्यंत 24 तास मोफत वीज, कंत्राटी नोकऱ्या बंद करून कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यात येतील, अशा घोषणा केल्या आहेत. याविषयी बोलतांना केजरीवाल म्हणाले, मी याविषयी आघाडीच्या इतर नेत्यांशी बोललो नाही, पण या माझ्या गॅरंटी आहेत. त्याच्याशिवाय कोणतेही राष्ट्र पुढे जाऊ शकत नाही.”

केजरीवालांच्या 10 गॅरंटी
1. देशात 24 तास वीज देणार. आपल्याकडे तीन लाख मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे, तर मागणी केवळ दोन लाख मेगावॅटपर्यंत आहे. गरीब लोकांना मोफत वीज दिली जाईल. त्यासाठी 1.25 लाख कोटी रुपये लागतील, आम्ही व्यवस्था करू.

2. आमची दुसरी हमी शिक्षणाची आहे. आम्ही सर्वाना चांगले शिक्षण देऊ. यातूनच देशाचा विकास शक्य आहे. देशातील सर्व सरकारी शाळा खासगी शाळांप्रमाणे करून मोफत शिक्षण दिले जाईल. त्यासाठी 5 लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी अर्धा खर्च केंद्र आणि अर्धा खर्च राज्य सरकार देईल

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज? 

3. उत्तम आरोग्य सुविधा पुरविणार. देशभरात मोहल्ला दवाखाने बांधले जातील. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधणार. त्यासाठी 5 लाख कोटी रुपये खर्च येणार आहे.

4. राष्ट्र सर्वोच्च. देशाच्या सैन्याला विशेष अधिकार दिले जातील. सर्व ताब्यात घेतलेली जमीन चीनच्या ताब्यापासून मुक्त केली जाईल.

5. अग्निवीर योजना बंद करून सर्व अग्निवीरांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या जातील. हा संपूर्ण पैसा देशाच्या सुरक्षेवर खर्च केला जाईल.

6. शेतकऱ्यांचा सन्मान आणि पिकांना पूर्ण किंमत देऊ. स्वामीनाथ आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी होईल

7. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल.

8. बेरोजगारी दूर करू. वर्षभरात दोन कोटी रोजगार निर्माण होतील.

9. भ्रष्टाचाराला आळा घालू. चौकाचौकात भाजपचे वॉशिंग मशीन फोडले जाणार आहे. दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच देशालाही भ्रष्टाचारमुक्त केले जाईल.

10. देशातील व्यापाऱ्यांसाटी धोरण आखण्यात येतील. व्यापाऱ्यांना जास्त परवानग्यांची गरज असणार नाही.

यावेळी बोलतांना केजरीवाल यांनी पीएम नरेंद्र मोदींवर जोदरार हल्लाबोल केला. ते म्हणाले, मोदींनी याआधीच्या निवडणुकांत जनतेला प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण तसं काही झालं नाही. मोदीजी दोन कोटी नोकऱ्या देणार होते. पण त्याही नोकऱ्या मिळाल्या नाहीत. तर आम्ही आम्ही चांगल्या शाळा, मोहल्ला दवाखाने यासह शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेबाबत आम्ही हमी दिली होती आणि दिलेली हमी पूर्ण केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज