मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

Mumbai Railway Development Corporation Job : रेल्वेत नोकरी (Railway job) करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही रेल्वे विभागात नोकरी करण्याची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नुकतीच मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने (Mumbai Railway Development Corporation) दोन रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता काय? याच विषयी जाणून घेऊ.

Arya Ambekar : चांद तू नभातला… आर्या आंबेडकरचा ग्लॅमरस लूक 

मुंबई रेल्वे विकास निगम लिमिटेड, मुंबईने दोन रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.

पदाचे नाव –
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने खालील पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
1. अपर महाप्रबंधक
2. संयुक्त महाप्रबंधक (सिविल)

पदांची संख्या –
1. अपर महाप्रबंधक – 01
2. संयुक्त महाप्रबंधक (सिविल) – 01

शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

वयोमर्यादा-
अपर महाप्रंबंधक/संयुक्त महाप्रबंधक (सिविल) या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा 50 वर्षे आहे.

अधिकृत वेबसाइट – https://mrvc. indianrailways.gov.in/

अधिसूचना –
https://mrvc.indianrailways.gov.in/uploads/VN_06_2024AGM_JGM(1).pdf

Eknath Khadse : निवडणूक लढणार का? एकनाथ खडसेंचं चकीत करणारं उत्तर 

अर्ज प्रक्रिया –
या पदासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज career@mrvc.gov.in या ईमेल पत्त्यावर पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
तुम्ही या पदासाठी ७ जून २०२४ पर्यंत अर्ज करू शकता.

अर्ज कसा करायचा?
या पदरभरतीसाठी उमेदवारांना आपला अर्ज हा ऑनलाइन पध्दतीने करावा लागेल. अर्ज वर दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा. अर्जात विचारलेली माहिती योग्य प्रकारे भरावी आणि सोबत आवश्यक कागदपत्रेही जोडावीत. अपूर्ण माहिती असलेले किंवा चुकीचे माहिती भररलेले अर्ज अपात्र ठरण्यात येतील. ७ जूनपर्यंत अर्ज करावे. त्यानंतर केलेले अर्ज अपात्र ठरवले जातील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज